जीवनाचा धागा तुटला असता तर..

By Admin | Updated: January 14, 2015 00:49 IST2015-01-14T00:49:01+5:302015-01-14T00:49:01+5:30

देवती शाळेचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून वडिलांच्या दुचाकीवर घराकडे निघाली. ती गाडीवर पुढे बसली होती. वर्धमाननगर रोडवर अचानक कुठून तरी मांजा आला. धारदार मांजामुळे देवतीचा गळा कापायला लागला.

If the thread of life was broken ... | जीवनाचा धागा तुटला असता तर..

जीवनाचा धागा तुटला असता तर..

नायलॉन मांज्यामुळे देवती गंभीर जखमी
देवती शाळेचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून वडिलांच्या दुचाकीवर घराकडे निघाली. ती गाडीवर पुढे बसली होती. वर्धमाननगर रोडवर अचानक कुठून तरी मांजा आला. धारदार मांजामुळे देवतीचा गळा कापायला लागला. ती जोरात किंचाळली. तिने मांजाला हाताने दूर करण्याचा प्रयत्न केल्याने तिची बोटेही कापली गेली. वडिलांच्या लगेच लक्षात आल्याने त्यांनी गाडी थांबविली. तिच्या बोटाला व गळ्याला झालेल्या जखमेतून रक्त वाहू लागले. वडिलांनी ताबडतोब डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी जखमेवर उपचार केला. लगेच उपचार मिळाल्याने देवती थोडक्यात बचावली. यात तिच्या बोटाची नस कापली असून, गळ्याला ७ टाके लागले आहे. या घटनेमुळे देवतीच्या घरचे, शेजारी व आप्तस्वकीयांना चांगलाच धक्का बसला. देवतीचा मोठा भाऊ ओमने पतंग उडविणारच नसल्याचा संकल्प केला. (प्रतिनिधी)
नायलॉन मांजाच्या
उत्पादनावर बंदी आणावी
नॉयलान मांजाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. पोलिसांनीही कारवाईचा इशारा दिला आहे. यापूर्वीही नायलॉन मांजामुळे अनेकांचे जीव गेले आहे. आज ही वेळ माझ्या मुलीवरही आली होती.यापुढे अशीवेळ कुणावरही येऊ नये, यासाठी सरकारने नॉयलान मांजाच्या उत्पादनावर बंदी आणावी, अशी भावना देवतीची आई उषा कथलेवार यांनी व्यक्त केली.

Web Title: If the thread of life was broken ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.