शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

Maharashtra Election 2019; सत्तेची लालसा असती तर कधीच पक्ष सोडला असता : प्रणिती शिंदें

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 11:58 IST

प्रणिती शिंदेंचा विरोधकांना टोला: आरोप करणाºयांनी आत्मपरीक्षण करावे

ठळक मुद्देमहापालिकेत, राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून हद्दवाढ भागाचा विकास रखडला - प्रणिती शिंदेहद्दवाढ भागातील रस्ते व पाणीपुरवठ्याची विदारक स्थिती मांडली - प्रणिती शिंदेकेंद्र, राज्य व महापालिकेत सत्ता असूनही शहरातील विकासकामे झाली नाहीत - प्रणिती शिंदे

सोलापूर : मला सत्ता वा पदाची लालसा नाही. जर असती तर कधीच मी काँग्रेस पक्ष सोडला असता. केवळ जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने मी राजकारणात आहे, असा प्रतिटोला शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी येथे बोलताना विरोधकांना लगावला.

अक्कलकोट रोडवरील रमणनगर येथे आयोजित कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या. आमदार शिंदे म्हणाल्या की, माझ्यावर आरोप करणाºयांनी स्वत: आत्मपरीक्षण करावे. केंद्र, राज्य व महापालिकेत सत्ता असूनही शहरातील विकासकामे झाली नाहीत. तर दुसरीकडे सत्तेसाठी इकडून तिकडे उड्या मारणाºयांची टोळीच तयार झाली आहे. अशा मंडळींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना साथ दिली नाही तर ते तुम्हाला तरी साथ कशी देतील. महाराष्ट्रात सत्ता कोणाचीही येऊ द्या, मी मात्र इथल्या जनतेसाठी काम करणार आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दूरदृष्टी ठेवून शहरासाठी अनेक विकासाची कामे केली. उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीची योजना त्यांनीच आणली. आहेरवाडी येथे एनटीपीसीचा प्रकल्प आणल्यावर त्यांनी शहराला जलवाहिनी देण्याची अट घातली. यामुळेच दुसरी जलवाहिनी मिळत आहे. १९९२ मध्ये सोलापूर ते उजनी जलवाहिनी त्यांच्यामुळेच आली. त्यामुळे दुष्काळात इतर शहरांना रेल्वेने पाणी आणले गेले पण सोलापूर शहरासाठी पाण्याची सोय झाली. पण आता महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून  परिस्थिती वेगळीच आहे. उजनी धरण शंभर टक्के भरून एक महिना झाला. धरणात मुबलक पाणीसाठा असूनही शहराला मात्र सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. ही परिस्थिती कोणामुळे निर्माण झाली असा सवाल आमदार शिंदे यांनी केला.

महापालिकेत, राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून हद्दवाढ भागाचा विकास रखडला आहे, असा आरोप त्यांनी केला. याप्रसंगी सिद्धाराम कळमंडे यांनी भाषणात हद्दवाढ भागातील रस्ते व पाणीपुरवठ्याची विदारक स्थिती मांडली. या भागात सुविधा मिळण्यासाठी आमदार शिंदे यांनी पाठपुरावा केला. गरिबांसाठी विविध योजना आणल्याचे नमूद केले. यावेळी धोंडप्पा तोरणगी, सिद्धाराम पाटील, दयानंद जाधव, विश्वनाथ शेटे, शिवराज चिलगुंडे, सुनील पाटील, अक्षय पाटील, अनिल पाटील, महादेव रामदे, सागर शेरखाने, मनीष सोनकवडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPraniti Shindeप्रणिती शिंदेPoliticsराजकारण