आत्महत्या रोखायच्या असतील तर, सीलिंग फॅनवर बंदी घाला - राखी सावंत
By Admin | Updated: April 5, 2016 21:01 IST2016-04-05T21:01:26+5:302016-04-05T21:01:26+5:30
प्रत्युषाच्या मृत्यूबद्दल हळहळ, दु:ख व्यक्त करत असताना अभिनेत्री राखी सावंतने सीलिंग फॅनवर बंदी घालण्याची अजब मागणी केली आहे.

आत्महत्या रोखायच्या असतील तर, सीलिंग फॅनवर बंदी घाला - राखी सावंत
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेऊन जीवन संपवल्याने अनेकांना धक्का बसला आहे. अनेकजण प्रत्युषाच्या मृत्यूबद्दल हळहळ, दु:ख व्यक्त करत असताना अभिनेत्री राखी सावंतने सीलिंग फॅनवर बंदी घालण्याची अजब मागणी केली आहे.
राखीने आज पत्रकार परिषद घेतली. यात तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे घरातल्या सीलिंग पंख्यांवर बंदी घालण्याची मागणी केली. घरातील मुली, बहिणी आणि सूना गळफास घेण्यासाठी घरातील सीलिंग फॅनचा वापर करतात. त्यामुळे सीलिंग फॅनवर बंदी घातली पाहिजे.
मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करते की, त्यांनी प्रत्येक घरातून सीलिंग फॅन हद्दपार करावा. तुम्ही तुमच्या मुली, बहिणीवर प्रेम करता तर, सीलिंग फॅनचा वापर बंद करा. सीलिंग फॅन काढून टाका आणि टेबल फॅन किंवा एसी वापरा अशी मागणी राखी सावंतने केली. राखी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येचा वापर करुन घेत असल्याबद्दलही तिच्यावर टीका होत आहे.