शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 06:25 IST

जाहीर सभेतील एक व्हिडीओ बुधवारी आमदार देवेंद्र भुयार यांचा व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : लग्नाला पोरगी पाहिजे असेल, तर पोरगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी स्मार्ट हवी असेल, तर ती तुमच्या माझ्यासारख्या पोरांना भेटत नाही, नोकरीवाल्यांना भेटते. दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते, ज्यांचा पानठेला आहे, धंदा, किराणा दुकान आहे, अशा माणसांना दोन नंबरची पोरगी भेटते आणि तीन नंबरचा गाळ राहिलेली पोरगी शेतकऱ्यांच्या पोरांना भेटते. शेतकऱ्यांच्या पोरांचं काही खरं राहिले नाही, अशा वादग्रस्त विधानाचा जाहीर सभेतील एक व्हिडीओ बुधवारी आमदार देवेंद्र भुयार यांचा व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

जन्माला येणारं जे लेकरू आहे, ते हे बाळ निघत राहते, तर माय इल्लू पिल्लू त्याच्यापोटी वानराचे पिल्लू असाच हा कार्यक्रम सगळा, असेही आमदार भुयार म्हणाले. त्यांच्या या विधानावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे.  

महिला उपभोगाचे साधन आहे का? : यशोमती ठाकूरअजित पवार आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावे, अशा प्रकारचे महिलांचे वर्गीकरण कोणीही खपवून घेणार नाही. तुम्हाला संसार आणि समाज धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.महिलांच्या मतासाठी तुम्ही जीवाचं रान करत आहे व दुसरीकडे महिलांचं वर्गीकरण करून महिलांचा अपमान करत आहे, त्यामुळे तुमची मानसिकता काय आहे, ते समजत आहे. महिला उपभोगाचे साधन आहेत का, अशी टीका आमदार यशोमती ठाकूर यांनी केली. 

मध्य प्रदेशात २०१९ मध्ये एका जाहीर कार्यक्रमात आयोजकांनी दिलेल्या ‘त्या’ विषयावर हे विधान आहे. या विधानाचा आता कोठेही संबंध नाही. महिलांचा अपमान किंवा टीका करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यावेळी पोरांना लग्नाची मुलगी मिळत नव्हती, म्हणून तेव्हाची वस्तुस्थिती मांडली.  - देवेंद्र भुयार, आमदार वरुड-मोर्शी.

देवेंद्र भुयार यांचे वक्तव्य हे केवळ महिलांचे अपमान करणारे आहे असे नाही. हे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची टिंगल उडविण्यासारखे आहे. यांना वाटते की आम्ही काहीही बोललो तरी आम्हाला कुणी काहीही शिक्षा करू शकत नाही. या मस्तवालपणातून हे होत आहे.- सुषमा अंधारे, नेत्या, उद्धव सेना

आमदार भुयार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधच आहे. स्त्रीच्या रुपापेक्षा तिच्याच असलेली शक्ती ओळखायला हवी. तुमची भाषा कुठल्याही सभ्य समाजाला शोभणारी नाही. अशा पद्धतीची वक्तव्य आपण टाळली पाहिजेत, ज्यामुळे महायुतीची बदनामी होईल.- चित्रा वाघ, नेत्या, भाजप

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार