शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला

By मनोज मुळ्ये | Updated: May 5, 2024 08:55 IST

Ratnagiri-Sindhudurg Lok sabha Election: वातावरण निर्मिती करण्यात महायुती, महाआघाडीला यश. कोकण हा पूर्वापार शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र, शिवसेनेत फाटाफूट झाल्यामुळे या मतदारसंघावर नेमके वर्चस्व कोणाचे आहे, हे आताच्या निवडणुकीतूनच कळणार आहे.

- मनोज मुळ्येलोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : गेली अनेक वर्षे सुरू असलेला राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष लोकसभा निवडणुकीनिमित्ताने पुन्हा दिसत आहे. त्यामुळे गतवेळेपेक्षा यावेळेच्या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीची अजूनपर्यंत एक-एकच मोठी सभा झाली आहे. मात्र, महायुतीकडून आणखी दोन मोठ्या सभा बाकी असून, त्यावर महायुतीची मोठी भिस्त आहे. सद्य:स्थितीत दोन्ही पक्षांना विजयाची समान संधी आहे.

कोकण हा पूर्वापार शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र, शिवसेनेत फाटाफूट झाल्यामुळे या मतदारसंघावर नेमके वर्चस्व कोणाचे आहे, हे आताच्या निवडणुकीतूनच कळणार आहे.

लोकसभेच्या मतपत्रिकेवर मशाल हे चिन्ह प्रथमच, तर कमळ हे चिन्ह ३३ वर्षांनी आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आपापली चिन्हे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडत आहेत. त्यासाठी मोठ्या सभांची संख्या मोजकीच असून, छोट्या सभा, खळा बैठका यांनाच अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. त्यातून कार्यकर्ते पक्षात टिकवून ठेवण्याचाही हेतू आहे.

कागदावरच्या संख्येत तरी महायुती प्रभावीगतवेळीची मते आणि त्यानंतर झालेली फाटाफूट पाहता महायुती प्रभावी दिसते. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघ महायुतीकडे आहेत, तर दोनच मतदार संघ महाविकास आघाडीकडे आहेत. त्यामुळे महायुतीकडे ताकद अधिक आहे, असे दिसते.विनायक राऊत यांच्या मतांमधून भाजपची आणि शिंदेसेनेची मते वजा झाली आहेत. त्याबदल्यात राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेसची मते त्यांना मिळणार आहेत. मात्र, वाढलेल्या मतांपेक्षा कमी झालेल्या मतांची संख्या अधिक आहे. कागदावर हे चित्र असले तरी सामान्य मतदार उद्धवसेनेच्या पाठीशी आहे की शिंदेसेनेच्या, हे स्पष्ट झालेले नाही.

सामंत बंधुंमधील वाद आघाडीच्या फायद्याचाnकिरण सामंत यांनी मंत्री उदय सामंत यांचा फोटो असलेले बॅनर हटवल्याने या दोन भावांमध्ये वाद असल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्याचा शिंदेसेनेकडून होणा�या प्रचारावर परिणाम होणार आहे. सामंतांमधील वादानंतर आता राऊत यांनी किरण सामंत यांचे कौतुक सुरू केले आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्देभाजपने आपला पक्ष फोडला, हाच आक्षेप लोकांसमोर ठेवत उद्धवसेनेने भाजप आणि शिंदेसेनेवर टीकास्त्र रोखले आहे.दहा वर्षांत कोकणात उद्योग उभारण्यापेक्षा येथून हाकलण्यात आलेल्या उद्योगांची संख्या अधिक आहे, असा भाजपचा आक्षेप आहे.सिडको प्राधिकरण हा उद्धवसेनेने कळीचा मुद्दा केला आहे, तर रत्नागिरीच्या विकासाचा विषय महायुतीने उचलून धरला आहे.

२०१९ मध्ये काय घडले?विनायक राऊत    शिवसेना (विजयी)    ४,५८,०२२नीलेश राणे    स्वाभिमान पक्ष    २,७९,७००नवीनचंद्र बांदिवडेकर    काँग्रेस    ६३,२१९नोटा    -    १३,७१३

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते         टक्के२०१४    विनायक राऊत     शिवसेना         ४,९३,०८८    ५५%२००९    नीलेश राणे    काँग्रेस    ३,५३,९१५    ४९%२००४    अनंत गीते    शिवसेना    ३,३४,६९०    ५९%१९९९    अनंत गीते    शिवसेना        २,९३,८३४    ५२%१९९८    अनंत गीते    शिवसेना        २,३८,९२८       ४६%

एकूण मतदार    १४,५१,६३०

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग