शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

"कुणाला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतोय, घरात बसून...", एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 15:46 IST

Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.  अशातच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काल उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. एकतर तू राहशील नाहीतर मी अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  प्रत्युत्तर दिलं आहे.

एखाद्याला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतोय, घरात बसून फेसबूकवरुन सरकार चालवणाऱ्यांचं ते काम नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. तसंच, राज्यात सुरू असलेल्या विकासामुळं विरोधक बिथरले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात विकास काम सुरू झाली. महाविकास आघाडीची अडीच वर्षे आणि आमच्या महायुतीच्या सरकारची दोन वर्षे यांची तुलना करता लोकांना समजेल. राज्यात सुरू असलेल्या विकासकामांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच पातळी सोडून टीका केली जाते. 

एखाद्याला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतो. घरात बसून फेसबुकवरून सरकार चालवणाऱ्यांचं ते काम नाही. आम्ही फिल्डवर उतरतो आणि काम करतो. त्यामुळे लोकांची पसंती आम्हालाच आहे. येत्या काळात राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

ऑलिम्पिकमध्ये पदक पटकवणाऱ्या स्वप्नील कुसळेचं अभिनंदनदरम्यान, ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळे यांने नेमबाजी प्रकारात कांस्य पदक मिळवलं. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नील कुसळे याचं अभिनंदन केलं. ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचं अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले, "स्वप्निल कुसाळेनं ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांनी चांगली कामगीरी केल्याबद्दल त्याचं आणि त्याच्या पालकांचं अभिनंदन करतो. महाराष्ट्र सरकार स्वप्निलला सर्वकाही सहकार्य करेल." 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण