सनातनवर बंदी घातली तर MIM वर पण घालावी लागेल - एकनाथ खडसे
By Admin | Updated: September 28, 2015 19:12 IST2015-09-28T19:12:27+5:302015-09-28T19:12:27+5:30
सनातन संस्थेवर बंदी घातली तर ओवैसी व MIM या पार्टीवरही बंदी घालावी लागेल असं सांगत भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी सनातन संस्थेवर बंदी घालता येणार नाही

सनातनवर बंदी घातली तर MIM वर पण घालावी लागेल - एकनाथ खडसे
>ऑनलाइन लोकमत
बुलढाणा, दि. २८ - जर सनातन संस्थेवर बंदी घातली तर ओवैसी व MIM या पार्टीवरही बंदी घालावी लागेल असं सांगत भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी सनातन संस्थेवर बंदी घालता येणार नाही असे स्पष्टीकरण दिले आहे. बुलढाण्यात बोलत असताना खडसे म्हणाले की, जर ठोस कारणे नसतील तर अशाप्रकारची बंदी न्यायालयात टिकत नाही त्यामुळे केवळ कुणीतरी मागणी केली म्हणून बंदी घालता येत नाही.
समीर गायकवाड या सनातनच्या साधकाला गोविंद पानसरे यांच्या हत्येत सहभागी असल्याच्या संशयावरून अटक झाल्यानंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांनी सनातनवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
दरम्यान, समीर गायकवाडला ९ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने आज दिले आहेत. पोलीस कोठडीतील त्याची मुदत आज संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. समीर तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलीसांचे म्हणणे असून सरकारी वकिलांनी त्याचं ब्रेन मॅपिंग करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली आहे. यासंदर्भात न्यायालयाचे निर्देश एक ते दोन दिवसांत मिळणे अपेक्षित आहे.