सॅम्पल औषधांची विक्री केल्यास गुन्हा दाखल
By Admin | Updated: March 31, 2015 02:53 IST2015-03-31T02:53:12+5:302015-03-31T02:53:12+5:30
औषधी उत्पादक कंपन्यांकडून सॅम्पल म्हणून मोफत देण्यात येणाऱ्या औषधांची विक्री केल्यास संबंधित कंपनीच्या एमआर (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह)

सॅम्पल औषधांची विक्री केल्यास गुन्हा दाखल
मुंबई : औषधी उत्पादक कंपन्यांकडून सॅम्पल म्हणून मोफत देण्यात येणाऱ्या औषधांची विक्री केल्यास संबंधित कंपनीच्या एमआर (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) आणि डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले जातील, अशी घोषणा अन्न व औषधी प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केली.
पुण्यात अस्तित्वात नसलेल्या औषध दुकानांच्या नावे बनावट बिले तयार करून किडनीच्या आजारावरील औषध विक्री केल्याप्रकरणी एका कंपनीचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने रद्द केल्याची घटना घडली. त्यावर योगेश टिळेकर, जगदीश मुळीक आदींनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर बापट म्हणाले, की या प्रकरणी ६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून औषध विक्रेत्याचा परवाना रद्द केला आहे. डॉ. कर्वे यांनी लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवरील औषध उपलब्ध नव्हते. त्यावर डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनच्यामागे अमुक एमआरला भेटायला सांगितले होते.