शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
दुधाचे दात पडण्याआधी कॉम्प्युटर शिकले, शाळेत शिकताना बनले सर्वात तरुण सीईओ...
9
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
10
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
11
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
12
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
13
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
14
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
15
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
16
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
17
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
18
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
19
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
20
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!

‘पतंजली’चे उत्पादन बेकायदेशीर असेल तर कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 3:32 AM

‘पतंजली’च्या उत्पादनावरून शुक्रवारी विधान परिषदेत मंत्री व विरोधक आमनेसामने आल्याचे दिसून आले.

नागपूर : ‘पतंजली’च्या उत्पादनावरून शुक्रवारी विधान परिषदेत मंत्री व विरोधक आमनेसामने आल्याचे दिसून आले. बाबा रामदेव यांनी पुत्रजीवक बीज बाजारात आणून याच्यामुळे मुलगाच होईल असा दावा केला आहे. ही बाब नियमबाह्य असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संजय दत्त यांनी केली. ‘पतंजली’च्या उत्पादनाची चौकशी करू व बेकायदेशीरपणा आढळला तर कारवाई करू, असे आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिले.संजय दत्त यांनी औचित्याच्या मुद्यातून ही बाब उपस्थित केली. बाबा रामदेव यांच्या पतंजलीने पुत्रजीवक बीज हे उत्पादन विक्रीला आणले आहे. याचे सेवन केले तर मुलगा होईल असा दावा करण्यात येत आहे. देश व राज्यातील विविध नियमांचा सार्वजनिकपणे भंग होत आहे. त्यांच्या कंपनीला देशभरात जमिनी देण्यात येत आहेत. अक्षरश: सैराट होऊन शासन त्यांना खैरात देत आहे, असा आरोप करत शासन व बाबा रामदेव यांच्यावर टीका केली. गिरीश बापट यांनी यावर उत्तर देताना बाबा रामदेव यांचा उल्लेख परमपूज्य असा केला. यावरून विरोधक त्यांच्यावर तुटून पडले. तुम्ही बाबांच्या तालावरच नाचा असा टोला दत्त यांनी मारला. मात्र बाबा रामदेव आमच्यासाठी पूज्यच आहेत. त्यांच्या कार्याची जगाने दखल घेतली. योगाला त्यांनी जगात पोहोचवले. त्यांच्या तालावर आम्ही नाचू व तुम्हालाही नाचवू, असे प्रतिपादन बापट यांनी केले. नियम सर्वांना सारखेच असतात. आम्ही ‘पतंजली’च्या संबंधित उत्पादनाची चौकशी करू व आवश्यकता वाटली तर कारवाई करू, असे बापट म्हणाले.

टॅग्स :patanjaliपतंजली