अधिकारी ऐकत नसतील तर शिवसेना स्टाईल उत्तर देऊ - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: November 29, 2015 17:54 IST2015-11-29T17:52:45+5:302015-11-29T17:54:04+5:30
दुष्काळी भागातील सरकारी अधिकारी मदत करत नसतील किंवा काम करत नसतील तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला

अधिकारी ऐकत नसतील तर शिवसेना स्टाईल उत्तर देऊ - उद्धव ठाकरे
>ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. २९ - दुष्काळी भागातील सरकारी अधिकारी मदत करत नसतील किंवा काम करत नसतील तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला आहे. सध्या मराठवाड्याच्या दुष्काळ दौ-यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नांडेद जिल्ह्यातील दीड हजार शेतक-यांना शेळीवाटप करण्यात आले तसेच आर्थिक मदतही देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
पुढील आठवड्यापासून विधानभवनाचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार असून त्याआधी सर्व आमदारांना पाहणी करून सगळीकडे चांगलं धान्य मिळतंय का याची तपासणी करण्यास सांगितल्याचे उद्धव यांनी नमूद केले.
संकटकाळात शिवसेना शेतकऱ्यांसोबत असल्याची ग्वाही देत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना मराठवाड्यात राबवणार असल्याची माहितीही उद्धव यांनी दिली