खर्च न केल्यास पुस्तक निधी जाणार परत

By Admin | Updated: July 20, 2016 03:27 IST2016-07-20T03:27:15+5:302016-07-20T03:27:15+5:30

सर्व शिक्षा अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि नगर पालिकेच्या १ हजार ५६१ शाळांना पुस्तके प्राप्त होणार आहेत.

If not spent, book funds will be returned | खर्च न केल्यास पुस्तक निधी जाणार परत

खर्च न केल्यास पुस्तक निधी जाणार परत


अलिबाग : सर्व शिक्षा अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि नगर पालिकेच्या १ हजार ५६१ शाळांना पुस्तके प्राप्त होणार आहेत. नावीण्यपूर्ण उमक्र माच्या माध्यमातून ४० लाख ५८ हजार ६०० रु पयांचा निधी उपलब्ध होणार आहे. १५ आॅगस्ट २०१६ पर्यंत रक्कम शाळा व्यवस्थापनाने खर्च न केल्यास सरकारकडे जमा होणार आहे. २०० पेक्षा कमी पुस्तके असणाऱ्या शाळांना या योजनेचा फायदा होणार आहे. ग्रामीण भागातील वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी ही योजना संजीवनी म्हणून प्रभावी काम करणार आहे.
महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषदेने यू डायसनुसार निवडलेल्या १ हजार ५६१ शाळांनी पुस्तकांसाठी मिळणारी रक्कम १५ आॅगस्टपर्यंत खर्च करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास तो निधी परत सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी सरकारने ७ आॅक्टोबर २०१५ रोजी निर्णय घेतला आहे. त्यानुसार माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून १५ आॅक्टोबर हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या पार्श्वमूमीवर प्रत्येक शाळेमध्ये डॉ. कलाम वाचन कट्टा उभारण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला होता. १५ आॅक्टोबर रोजी राज्यातील २.२३ कोटी मुले किमान प्रत्येकी १0 पुस्तके असे एकूण २२.३0 कोटी पुस्तके वाचण्याचा हा संकल्प आहे.
प्रत्येक शाळेत २00 पेक्षा जास्त पुस्तके अपेक्षित आहेत. वाचन प्रेरणा चळवळ रुजविणे व मुलांच्या वयानुरूप पुस्तकांची उपलब्धता करण्यासाठी माजी विद्यार्थी, पालक, व्यक्तिगत, समाजातून पुस्तक भेटीच्या कार्यक्र मातून पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
>पुस्तक खरेदीसाठी २ हजार ६०० रुपये
जिल्ह्यातील १ हजार ५६१ शाळांना पुस्तके खरेदीसाठी प्रत्येकी २ हजार ६०० रुपयांप्रमाणे एकूण ४० लाख ५८ हजार ६०० मिळणार आहे. ही रक्कम जि. प. शिक्षण विभागाकडून थेट शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. शाळांना पुस्तकांसाठी निधी उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागेल व वाचन संस्कृतीला चालना मिळेल.रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात १0४, पेण १५७, पनवेल १४९, उरण २४,कर्जत १८१, खालापूर १५६, रोहा १४९, सुधागड ८६, माणगाव १५८, महाड १५७,पोलादपूर ६१, श्रीवर्धन ४९, म्हसळा ३१, मुरु ड ५१, तळा ४८, अशा एकूण एक हजार ५६१ शाळांना वाचन कट्ट्यासाठी पुस्तके मिळणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: If not spent, book funds will be returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.