गरज पडल्यास राज्याच्या भल्यासाठी आम्ही एकत्र येऊ - राज ठाकरे
By Admin | Updated: October 8, 2014 13:18 IST2014-10-08T13:15:55+5:302014-10-08T13:18:24+5:30
गरज पडल्यास महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी व उद्धव एकत्र येऊ असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सेना मनसेच्या संभाव्य युतीवर भाष्य केले.

गरज पडल्यास राज्याच्या भल्यासाठी आम्ही एकत्र येऊ - राज ठाकरे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - गरज पडल्यास महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी व उद्धव एकत्र येऊ असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सेना मनसेच्या संभाव्य युतीवर भाष्य केले. आमचं आम्ही पाहून घेऊ, त्याची चिंता इतरांनी करण्याची गरज नाही असेही ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले.
शिवसेना व मनसे एकत्र येणार का असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला असता, मी सत्तेसाठी लाचार नाही, पण महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, विकासासाठी एकत्र यायचं असेल तर आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ. कोणाचाही इगो, भांडण यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असंही ते म्हणाले. तसेच तुमच्यापेक्षा आम्हाला महाराष्ट्राची जास्त चिंता आहे असेही त्यांनी स्पष्ट केलं.
गेल्या अनेक दिवसांपासून राज-उद्धव यांच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. सध्या राज व उद्धव यांच्या भाषणातील सूरही एकच 'मोदीविरोधी' दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक तर्क लढवले जात असून राज यांच्या या विधानाने अनेक चर्चांना उधाण आले