शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

नाणार रिफायनरी विदर्भात आल्यास विकासाला गती मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 05:23 IST

रत्नागिरीच्या नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या पेट्रोलियम रिफायनरीवरून भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. यापूर्वीच हा प्रकल्प विदर्भात उभारण्यात यावा अशी मागणी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ एप्रिल रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

नागपूर : रत्नागिरीच्या नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या पेट्रोलियम रिफायनरीवरून भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. यापूर्वीच हा प्रकल्प विदर्भात उभारण्यात यावा अशी मागणी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ एप्रिल रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ ने विदर्भातील विविध राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीचे मत जाणून घेतले. यात बहुतांश लोकप्रतिनिधींनी हा प्रकल्प विदर्भात उभारण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रकल्पामुळे विदर्भ विकासाला गती मिळेल, अशी भूमिका काहींनी मांडली.नागरिकांचे सहकार्य आवश्यकनाणार प्रकल्प विदर्भात आल्यास विकासाला निश्चितच गती मिळेल. विदर्भात रोजगाराच्या संधी वाढतील. नाणार सोबत सरकारने टेक्सटाईल पार्क संदर्भातही तत्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे.- भावना गवळी, खासदार, यवतमाळ-वाशिमनिश्चितच विकास होईलपेट्रोलियम रिफायनरी विदर्भात जिथे कुठे जागा उपलब्ध आहे. ती उभारण्यास विरोध नाही. हा प्रकल्प विदर्भात स्थापन झाल्यास निश्चितच विकासाला गती मिळेल.- अ‍ॅड.शिवाजीराव मोघे,माजी मंत्रीरोजगाराच्या संधी वाढतीलविदर्भात उद्योग याव्यात यासाठी सरकार प्रयत्न करीत आहेच. नाणार रिफायनरी येथे आल्यास स्वागतच आहे. त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी वाढतील. यासोबतच ट्रान्सपोर्ट रेट कमी झाल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात येतील.- विकास कुंभारे,आमदार मध्य नागपूरस्थानिक लोकांना रोजगार मिळावाविदर्भात प्रकल्प आलेच पाहिजे. कृषी आधारीत प्रक्रिया उद्योगावर लक्ष देणे गरजेचे आहे. यात स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. विदर्भात रिफायनरी स्थापन झाल्यास आनंदच होईल.- वीरेंद्र जगताप,आमदार, चांदूर रेल्वेरिफायनरी गोंदियात आणापेट्रोल रिफायनरी गोंदिया जिल्ह्यात स्थापना झाल्यास विदर्भाचा विकास होईल. येथील बेरोजगारांना रोजगार मिळतील. यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पावले उचलणे गरजेचे आहे.- विजय रहांगडाले,आमदार, तिरोडाविदर्भासाठी संधीविदर्भात मोठ्या उद्योगांची संख्या कमी आहे. बेरोजगारीचे प्रमाण कमी आहे. नाणारची प्रस्तावित रिफायनरी विदर्भात स्थापन झाल्यास वैदर्भीयांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होईल.- धर्मरावबाबा आत्राम, माजी राज्यमंत्रीपेट्रोलचे भाव कमी होतीलनाणारचा प्रकल्प विदर्भात स्थापन झाल्यास रोजगाराच्या संधी वाढतील. पेट्रोलचे दर विदर्भात कमी होतील. या एका प्रकल्पापाठोपाठ इतर उद्योगही विदर्भात येतील.- प्रा.राजू तोडसाम,आमदार आर्णी-केळापूरतरुणांना रोजगाराच्या संधीविदर्भात पेट्रोलचे दर जास्त आहे. इतकेच काय बेरोजगारांची संख्याही इथे अधिक आहे. अशात सरकार जर नाणारची प्रस्तावित पेट्रोलियम रिफायनरी विदर्भात स्थापन करीत असेल अधिक चांगले होईल.- रवि राणा, आमदार, बडनेराविदर्भाचा फायदाच होईलनाणारची पेट्रोलियम रिफायनरी विदर्भात आल्यास निश्चितच काही प्रमाणात अनुशेष कमी होईल. स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळतील.- संजय पुराम आमदार, आमगाव-देवरीमहसूल वाढेलविदर्भात पेट्रोलियम रिफायनरी स्थापन केल्यास स्वागतच आहे. येथील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्धल होतील. यासोबतच सरकारच्या महसुली उपत्नात वाढही होईल. यासाठी सर्वांना पुढाकार घेण्याची गरज आहे.- डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र