शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"कायदा व सुव्यवस्था सांभाळता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 21:52 IST

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक गरवारे क्लब हाऊस येथे पार पडली

मुंबई - राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. धार्मिक दंगली होत आहेत, महिला असुरक्षित आहेत, मंत्रालयाजवळच्या वसतीगृहात मुलीवर अत्याचार व हत्या झाली, लोकलमध्ये मुलीवर अत्याचार झाला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा-सहा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहे. मंत्रालयातील अनेक विभाग आहेत त्यामुळे त्यांना गृहमंत्रिपद झेपत नाही. फडणवीस यांना जमत नसेल तर त्यांनी गृहमंत्रिपद सोडावे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. 

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक गरवारे क्लब हाऊस येथे पार पडली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा वारकऱ्यांवर लाठीमार करून या सरकारने वारकरी संप्रदायाचा अपमान तर केला आहे त्यासोबत या महान परंपरेला गालबोट लावण्याचे पाप ही केले आहे. पण लाठीहल्ला झालाच नाही असे गृहमंत्री खोटे बोलत आहेत. खोटं बोलून तुमची पापं लपवता येणार नाहीत हे लक्षात ठेवावे असा हल्लाबोल त्यांनी केला. कोअर कमिटीच्या बैठकीला विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, तेलंगाणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, उपस्थित होते.

मेरिटच्या आधारावर जागा वाटपाचा निर्णय  लोकसभा निवडणुकीच्या जागांचा आढावा घेताना मताचे विभाजन होणार नाही यावरही भर दिला जात आहे. देश वाचवण्याची ही लढाई असून देश, लोकशाही, संविधान वाचवणे हे आमचे काम आहे. जागा वाटपाचा निर्णय मविआच्या बैठकीत मेरिटच्या आधारावर होईल. भाजपाचे सत्तेतून उच्चाटन करण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र येऊन प्रयत्न करु हाच आमचा मुख्य उद्देश आहे असं नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस पक्षाने लोकसभेच्या प्रत्येक जागेचा बारकाईने अभ्यास केला आहे. मविआची बैठक होईल त्यावेळी प्रत्येक जागा कशी जिंकता येईल यावर आम्ही सर्वजण विचार करु. पुढच्या आठवड्यात इतर समविचारी पक्षांबरोबरही चर्चा करणार आहोत.  कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे २५ जूनला सांगली येथे एका कार्यक्रमासाठी येत आहेत, त्यांच्याबरोबरही बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली जाईल. निवडणुकीत शेतकरी, बेरोजगारी, महागाई हे प्रमुख मुद्दे असतील. देशातील या ज्वलंत मुद्द्यांवर जनतेत जाऊन भाजपा सरकारची पोलखोल करु. वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसकडे कोणताही प्रस्ताव दिलेला नाही जेव्हा त्यांचा प्रस्ताव येईल त्यानंतर त्यावर चर्चा करु. मविआने एकत्र राहून निवडणुका लढवाव्या हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे असं पटोलेंनी सांगितले. नाव बदलून नेहरूंचे योगदान पुसता येणार नाहीपंडित जवाहरलाल नेहरु यांचे नाव भाजपा सरकारने बदलले यात नवल वाटण्यासारखे काहीच नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने भाजपा मतं मागते आणि नंतर स्टेडियमचे नाव बदलून मोदी स्वतःचे नाव देतात. पंडित नेहरु यांच्या नेतृत्वामुळेच भारताचा विकास झाला, सर्व क्षेत्रात प्रगती झाली. त्यामुळे नेहरुंचे नाव बदलल्याने नेहरुंची कर्तृत्व कमी होत नाही, अशी नावे बदलून त्यांच्या या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि स्वातंत्र्यानंतर या देशाला आधुनिक विकसित करण्यासाठी त्यांनी जे मोलाचे योगदान दिले आहे ते पुसता येणार नाही, असेही पटोले म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस