शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"बदनामी करण्याच्या कंत्राटावरही जिएसटी लावला, तर मिमीक्री बंद होईल", दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 09:45 IST

"माननीय राजसाहेब व्हॅाट्सॲपवर जिएसटी लावला तर तुमचे कार्यकर्ते लोकांची बदनामी करणार कसे?"

माझ्यामते दूध आणि दह्यावर जीएसटी लावण्याऐवजी व्हॉट्सअ‍ॅपवर जीएसटी लावला हवा, कारण त्यावर कुणीही वाटेल ते टाकत असतात, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्त वाहिणीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. यावरून आता शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी राज यांच्यावर निशाणा साधला आहे. "बदनामी करण्याच्या कंत्राटावरही जिएसटी लावला तर मिमीक्री बंद होईल," असे दीपाली सय्यद यांनी म्हटले आहे.

काय म्हणाल्या दीपाली सय्यद - "माननीय राजसाहेब व्हॅाट्सॲपवर जिएसटी लावला तर तुमचे कार्यकर्ते लोकांची बदनामी करणार कसे? ग्रीन-टीच्या व्हिडीओला शिलेदार दारू म्हणून पसरवून पक्षाची इज्जत वाचवताना आम्ही पाहिले आहे, बदनामी करण्याच्या  कंत्राटावरपण जिएसटी लावला तर मिमीक्री बंद होईल," असे ट्विट दीपाली सय्यद यांनी केले आहे.

नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे -राज ठाकरे यांनी आपल्या या मुलाखतीत विविध विषयांवर भाष्य केले. सध्या जीएसटी वाढवल्याने मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. यावर मिश्किल प्रतिक्रिया देर राज म्हणाले होते, माझ्यामते आता दूध, दह्यावर जीएसटी लावण्याऐवजी व्हॉट्सअ‍ॅपवर जीएसटी लावायला हवा. कारण ज्याला जे वाटेल ते तो तेथे टाकत असतो. एवढेच नाही, तर हल्ली सगळीकडे अगदी पत्रकारितेतही हीच गोष्ट झालेली आहे. अनेक स्तंभलेखक वेगवेगळ्या पक्षाचे झाले आहेत. स्वतंत्र पत्रकार खूप कमी उरले आहेत, असेही राज ठाकरे यांनी म्हटले होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जर आज असते, तर... -या मुलाखतीत राज यांनी शिवसेनेतील बंडखोरीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात सत्तानाट्य घडले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरुन पायऊतार व्हावे लागले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जर आज असते, तर हे शक्यच झाले नसते, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले होते. 

टॅग्स :deepali sayedदीपाली सय्यदRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाShiv Senaशिवसेना