गणेश नाईक भाजपात आल्यास त्यांचं आरती घेऊन स्वागत : मंदा म्हात्रे

By Admin | Updated: April 3, 2017 17:13 IST2017-04-03T17:13:53+5:302017-04-03T17:13:53+5:30

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गणेश नाईक भारतीय जनता पक्षात आले तर मी त्यांचं स्वागतच करेन

If Ganesh Naik comes to BJP, welcome him with his aarti: Manda Mhatre | गणेश नाईक भाजपात आल्यास त्यांचं आरती घेऊन स्वागत : मंदा म्हात्रे

गणेश नाईक भाजपात आल्यास त्यांचं आरती घेऊन स्वागत : मंदा म्हात्रे

>ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 3 - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गणेश नाईक भारतीय जनता पक्षात आले तर मी त्यांचं स्वागतच करेन, असं विधान भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केलं आहे. नवी मुंबईतील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
 
"गणेश नाईक यांचं मी त्यांची आरती घेऊन स्वागत करेन. यापूर्वी मीच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन गेले होते. मात्र, राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांनी मलाच दगाफटका केला होता. पण तरीही मी त्यांच्या भाजपा प्रवेशासाठी तयार आहे," असं मंदा म्हात्रे म्हणाल्या.
 
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचा गड खालसा होण्याची चर्चा रंगली होती. माजी मंत्री गणेश नाईक हे सहकुटुंब भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आता मंदा म्हात्रे यांच्या विधानानंतर नाईक कुटुंबाच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Web Title: If Ganesh Naik comes to BJP, welcome him with his aarti: Manda Mhatre