शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंना संधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 06:33 IST

Nitin Gadkari : प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपतर्फे बावनकुळे यांचा शनिवारी येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी गडकरी बोलत होते.

नागपूर : देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर चंद्रशेखर बावनकुळे यांचा नक्कीच विचार होऊ शकतो, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बावनकुळे हेदेखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे संकेत दिले.प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपतर्फे बावनकुळे यांचा शनिवारी येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी गडकरी बोलत होते. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाल्यावर पुढे काय काय होऊ शकते, हे समोर दिसतच आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हणताच सभागृहात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा जयघोष सुरू झाला. ‘आपण मुख्यमंत्र्यांबाबत शुभेच्छा दिल्या नाहीत, तर पुन्हा मीडियावाले गडकरी-फडणवीस आमने-सामने लावतील’, अशी कोपरखळी मारत गडकरींनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला; पण पुन्हा दुसऱ्याच क्षणाला समजा पुढे फडणवीस मोठे झाले, केंद्रात गेले, तर बावनकुळे यांचा नक्कीच विचार होऊ शकतो, असेही गडकरी म्हणाले. भाजपमध्ये घराणेशाही नाही. त्यामुळे आता मला नाहीतर माझ्या मुलाला, पत्नीला तिकीट द्या, हे धंदे बंद; पण जनता म्हणेल तर नक्की तिकीट मिळेल, असेही गडकरी म्हणाले. आगामी काळात तिन्ही पक्ष एकत्र आले तरी भाजप एकट्याच्या ताकदीवर निवडून येईल एवढी मोठी शक्ती उभारू, पक्षाने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.

अध्यक्षपद सोपवून बावनकुळेंचा मोठा सन्मान : फडणवीसगेल्या निवडणुकीत बावनकुळे यांना थांबावे लागले. त्यावेळी लोक बावनकुळे यांचे राजकारण संपले असे सांगत होते; पण भाजपची ध्येय, धोरणे, नीती आपल्याला ठावूक आहे. बावनकुळे यांनी लगेच निर्णय स्वीकारला. त्यांच्या पक्षनिष्ठेला तोड नाही. ३२ मतदारसंघांचे दौरे करून प्रचार केला. मी त्याच दिवशी बोललो होतो, जनतेच्या मनातील नेता असलेल्या या कार्यकर्त्याला एक दिवस याहीपेक्षा मोठे पद मिळेल. आज तो क्षण आपण अनुभवत आहोत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांचा गौरव केला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे