शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बिरोबाची शपथ हाय! जर धनगरांना आरक्षण मिळालं नाही तर...; काय म्हणाले होते गोपीचंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 14:45 IST

सांगली लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळविली होती

मुंबई - वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्याविरोधात गोपीचंद पडळकर यांना भाजपाची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर विरुद्ध अजित पवार असा सामना बारामतीच्या आखाड्यात पाहायला मिळणार आहे. 

सांगली लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळविली होती. 3 लाखांहून अधिक मतदान गोपीचंद पडळकरांना पडल्यामुळे सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. प्रसिद्ध वक्ता म्हणून धनगर समाजात लोकप्रिय असलेले गोपीचंद पडळकर यांना भाजपात घेऊन बारामतीत धनगर समाजाला आकर्षिक करण्याचा प्रयत्न भाजपाकडून झाला आहे. राजकारणाच्या सुरुवातील महादेव जानकरांच्या रासपामध्ये, 2014 ची निवडणूक भाजपाकडून, 2019 लोकसभा वंचित बहुजन आघाडीकडून आणि आता पुन्हा 2019 विधानसभा निवडणूक भाजपाकडून असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. भाजपात प्रवेश केल्यानंतर गोपीचंद पडळकर यांचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी गोपीचंद पडळकर हे भाजपातून बाहेर पडत राज्यभर धनगर समाजाचे मेळावे घेत होते. त्यातील एक व्हिडीओ व्हायरल करून गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करण्याचं काम सुरु आहे. 

या व्हिडीओत गोपीचंद पडळकर म्हणतात की, भारतीय जनता पार्टीने धनगरांना आरक्षण दिलं नाही तर माझ्या घरातलं कोणी उभं राहिलं, माझी आई उभी राहिली तरी मतदान द्यायचं नाही, मी उभा राहिलो तरी मतदान द्यायचं नाही, माझा उभा राहिला तर मतदान द्यायचं नाही, बिरोबाची शपथ हाय अशा शब्दात उपस्थित लोकांना आश्वासन देतात.

मात्र त्यांचा हाच व्हिडीओ निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल झाल्याने गोपीचंद पडळकर यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधक पुढे सरसावणार आहेत. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांपैकी गोपीचंद पडळकर हे एकटेच नाही तर अन्य नेत्यांचेही जुने व्हिडीओ व्हायरल होत असल्याने विरोधकांच्या हातात आयतं कोलीत सापडलं आहे.  

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरDhangar Reservationधनगर आरक्षणBJPभाजपा