शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा मैत्री व्हावी, दोघंही राजकारणात राहावेत; रामदास आठवलेंची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 17:59 IST

देवेंद्र फडणवीस यांनी या आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्यांचा चेहरा विश्वासक आहे, असे रामदास आठवले म्हणाले. 

पुणे : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे. सध्याचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने नितीन गडकरींचा नंबर लागला होता. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा विचार होत आहे. देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली तर आनंदाची गोष्ट आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 

गुरुवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त पुण्यातील सारसबाग परिसरात मातंग समाज समन्वय समिती पुणे यांच्यातर्फे अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी रामदास आठवले यांनी पुन्हा प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रामदास आठवले म्हणाले, भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे त्यांना कोणालातरी राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्यांचा चेहरा विश्वासक आहे, असे रामदास आठवले म्हणाले. 

याचबरोबर, देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तरी ते महाराष्ट्रामध्ये असणारच आहेत. त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली, तर ती आनंदाची गोष्ट आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस राष्ट्राध्यक्ष झाले तर भाजप अजून मजबूत होईल. फडणवीसांचा भाजपला चांगला उपयोग होऊ शकतो. देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळाली तर आम्हाला नक्कीच आनंद होईल, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

"ठाकरे-फडणवीस यांच्यातील वाद मिटला नाही तर..."राजकारणात सध्या उद्धव ठाकरे वर्सेस देवेंद्र फडणवीस वाद सुरू आहे. यावर रामदास आठवले म्हणाले, राजकारणामध्ये दोघेही राहतील. एकाचं राजकारण होत नसतं. उद्धव ठाकरे म्हणतात एक तर ते राहतील किंवा फडणवीस राहतील. माझी दोघांनाही विनंती आहे. दोघांनाही राजकारणात राहिलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोडले असं नाहीये. मला वाटतंय राजकारणात दोघेही राहतील. उद्धव ठाकरेंनी मनातील चीड काढून टाकावी. पुन्हा एकदा दोघांची मैत्री व्हावी अशी आमची इच्छा आहे. मात्र यांच्यातील वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मी आहे, असे विधान रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे