पुनर्विकासात विकासक दोषी आढळल्यास कारवाई करू
By Admin | Updated: March 8, 2017 00:56 IST2017-03-08T00:56:47+5:302017-03-08T00:56:47+5:30
शहर व उपनगरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासानंतर विकासकांनी अतिरिक्त चटई क्षेत्रफळ सदनिका स्वरूपात म्हाडाला दिल्या नसल्याच्या तक्रारींबाबत आर्थिक गुन्हे

पुनर्विकासात विकासक दोषी आढळल्यास कारवाई करू
मुंबई : शहर व उपनगरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासानंतर विकासकांनी अतिरिक्त चटई क्षेत्रफळ सदनिका स्वरूपात म्हाडाला दिल्या नसल्याच्या तक्रारींबाबत आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत तपास सुरू असून, दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितले.
शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात आशिष शेलार, नितेश राणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी वायकर यांनी सांगितले की, अशा ३३ प्रकरणामंध्ये म्हाडास जमीन प्राप्त झालेली नाही. या प्रकरणांतील विक्रीयुक्त बांधकाम अद्याप सुरू झाले नाही, अशी २ प्रकरणे, गुन्हा नोंदविण्यापूर्वी मंडळास अतिरिक्त बांधकाम क्षेत्र सुपुर्द केले, असे एक प्रकरण व न्यायप्रविष्ट असलेले प्रकरण वगळता व अन्य २९ प्रकरणांमध्ये म्हाडामार्फत नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या आधारे मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत तपास करण्यात येत आहे. यामध्ये २६ गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्रे दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)