तर भ्रष्टाचारी अधिकारी होणार बडतर्फ

By Admin | Updated: December 16, 2015 03:02 IST2015-12-16T03:02:34+5:302015-12-16T03:02:34+5:30

वारंवार भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्यांना थेट बडतर्फ केले जाऊ शकते का? यासंदर्भात कायदेशीर अभिप्राय मागविला जात आहे. सकारात्मक अभिप्राय आल्यास अशा अधिकाऱ्यांविरुद्ध

If the corrupt officials will be in office | तर भ्रष्टाचारी अधिकारी होणार बडतर्फ

तर भ्रष्टाचारी अधिकारी होणार बडतर्फ


नागपूर : वारंवार भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्यांना थेट बडतर्फ केले जाऊ शकते का? यासंदर्भात कायदेशीर अभिप्राय मागविला जात आहे. सकारात्मक अभिप्राय आल्यास अशा अधिकाऱ्यांविरुद्ध थेट बडतर्फ करण्याची कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.
विजय काळे, शरद सोनावणे यांनी पुणे शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव यांना पाच लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी १ आॅक्टोबर रोजी पकडल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. यादव यांना २००५ मध्ये सुद्धा पुणे महानगरपालिकेतील टीडीआर घोटाळ्या प्रकरणी १ जुलै २००७ रोजी निलंबित करण्यात आले असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित करीत वारंवार भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई का केली जात नाही, असा संताप व्यक्त केला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात उपरोक्त माहिती दिली. (प्रतिनिधी)

हातकणंगले येथील भ्रष्टाचारी अधिकारी निलंबित
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील लाच घेताना पकडण्यात आलेले आरोपी उपनिबंधक (सहकारी संस्था) सुनील सिंगतकर, सहायक सहकारी वकील संजय थैल आणि सहकारी वकील अरुण कुंभार यांना निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी केली जाईल. त्यात दोषी आढळल्यास बडतर्फ केले जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानसभेत उपस्थित प्रश्नाच्या उत्तरात दिली. डॉ. सुजित मिणचेकर यांनी हा प्रश्न विचारला होता.

Web Title: If the corrupt officials will be in office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.