शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

'मुख्यमंत्र्यांना पटलं तर पालकमंत्री बदलतील', भुजबळांनी सुहास कांदेंचे आरोप फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 17:41 IST

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करत जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला. दरम्यान, छगन भुजबळ यांनीही सुहास कांदे यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.

नाशिक :  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि शिवसेना आमदार सुहास कांदे (Shiv Sena MLA Suhas Kande) यांच्यातील वाद आणखी चिघळल्याचे दिसून येत आहे. आमदार सुहास कांदे यांनी आज पत्रकार परिषद घेत थेट छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. छगन भुजबळ यांना पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करत जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला. दरम्यान, छगन भुजबळ यांनीही सुहास कांदे यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.

गुरुवारी छगन भुजबळ यांनाही पत्रकार परिषद घेतली. यावेळी नांदगावला 45 कोटी निधी दिला. या वर्षीचा निधी कोरोनासाठी वापरा हे सरकारचे निर्देश होते. निधी वाटप हा जिल्हाधिकारी समितीने घेतला आहे. मी निधी वाटतो हा सुहार कांदे यांचा आरोप चुकीचा आहे. पालकमंत्री म्हणून सगळ्यांना समान वाटप करणे हे माझे काम आहे. यावरून हायकोर्टात जाणे योग्य नाही. मुख्यमंत्री हे शिवसेनेचे आहेत, हे त्यांना सांगा. मुख्यमंत्र्यांना पटले तर ते पालकमंत्री बदलतील, असे छगन भुजबळ म्हणाले.

याचबरोबर,  असे आरोप महाविकास आघाडी असताना करणे योग्य नाही. मी सुहास कांदे यांना सहकार्य करणार. मी कोणालाही धमकी देत नाही मात्र विनंती जरूर करतो. हा भुजबळ विरुद्ध शिवसेना संघर्ष नाही. सुहास कांदे शिवसेनेचे म्हणून शिवसेना नेते त्यांच्यासोबत असावेत. निवडणूक आली की वेगवेगळे पक्ष युती करतात. प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने प्रयत्न करणार आणि शेवटी जनता ठरवेल कोण योग्य, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्याचा राग त्यांच्या कुटुंबीयांना राहिला नाही, यांनाच का? असा सवालही करत माझ्याकडून या विषयाला पूर्णविराम दिला आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

'निधी वाटपाचा अधिकार भुजबळांना नाहीच'दरम्यान, आमदार सुहास कांदे यांनी आज पत्रकार परिषद म्हटले की, छगन भुजबळ आणि माझा वाद हे महाविकास आघाडीचे भांडण नाही. 12 कोटी निधी आला. यातील 10 कोटी ठेकेदारांना भुजबळांनी वाटले. माझ्या मतदारसंघात फक्त 2 कोटी दिले. भुजबळांना नियोजन निधी वाटपाचा अधिकारच नाही. अधिकार नसताना छगन भुजबळ यांनी वाटप करून गैरव्यवहार केला. त्यांचे पालकमंत्रिपद काढावे ही मागणी आहे. छगन भुजबळ यांनी भ्रष्टाचार केला आहे. माझ्याजवळ त्याचे पुरावे आहेत. हे पुरावे मुख्यमंत्र्यांना आणि अजित पवारांना सादर केले आहेत. मी त्यांच्यासोबत कधीही चर्चेला येण्यासाठी तयार आहे. भाजीपाला विकणारे भुजबळ,25 वर्षात 25 हजार कोटींचे मालक कसे झाले? असा सवालही यावेळी सुहास कांदे यांनी उपस्थित केला.

आमदार सुहास कांदे यांना धमकी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना थेट छोटा राजन टोळीकडून धमकीचा फोन आल्याची धक्कादायक बाब समोर आली. सुहास कांदे यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्तालयाकडे मंगळवारी (दि.२८) दुपारी तक्रार अर्ज दिला आहे. सोमवारी (दि.२७) कांदे हे गंगापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदवली येथील त्यांच्या घरी असताना संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर संशयित अक्षय निकाळजे नावाच्या व्यक्तीने फोन केला. यावेळी त्याने ‘मी अक्षय निकाळजे बोलत आहे, मी छोटा राजनचा पुतण्या असून तुम्ही उच्च न्यायालयात जे रिट पिटिशन दाखल केलेले आहे, ते कोर्टातून काढून घ्या अन्यथा तुमच्यासाठी व कुटुंबियांसाठी चांगले होणार नाही...’ अशी धमकी दिल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. कांदे यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्तालयाकडे मंगळवारी (दि.२८) दुपारी तक्रार अर्ज दिला आहे.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिकShiv Senaशिवसेना