शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

2019 मध्ये भाजपा सत्तेत आल्यास ती शेवटची निवडणूक ठरेल - पृथ्वीराज चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 10:22 IST

2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. अनेक राजकीय पक्ष यासाठी तयारीला लागले आहे. तसेच, नेतेमंडळी सुद्धा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाषणबाजी करत आहेत. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यापार्श्वभूमीवर राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपावर टीका केली आहे. 

ठळक मुद्दे2019 मध्ये भाजपा सत्तेत आल्यास ती शेवटची निवडणूक ठरेल देश हुकूमशाहीत लोटला जाईलघोटाळे करून बँका बुडविणारे देश सोडून पळून जात आहेत

मुंबई: 2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. अनेक राजकीय पक्ष यासाठी तयारीला लागले आहे. तसेच, नेतेमंडळी सुद्धा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाषणबाजी करत आहेत. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यापार्श्वभूमीवर राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपावर टीका केली आहे. राज्यासह देशात सध्या ज्या प्रकारची स्थिती आहे, ते पाहता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपा सत्तेत आल्यास ही या देशातील शेवटची निवडणूक ठरेल. देश हुकूमशाहीत लोटला जाईल, असा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. ते म्हणाले,  विधानसभेत सभापतीविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव मांडल्यानंतर त्यावर 14 दिवसांत निर्णय येणे आणि त्यानंतर सात दिवसात सभागृहात चर्चा घेवून मतदान घेणे नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, बहुमत असलेल्या भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारने चर्चाच नाकारली. उलट विधानसभेच्या कामकाजाच्या सूचित विषय नसताना मुख्यमंत्री स्वतः सभागृहात विश्‍वास ठराव मांडतात आणि कोणतीही चर्चा न करता तो संमत करून अधिवेशन गुंडाळले जाते, ही हुकमशाहीची सुरुवात नाही तर काय, असा प्रश्‍नही पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थितांना केला. कॉंग्रेसच्या नेत्यांनी केंद्रातील भाजपा सरकारला घेराव घातले आणि सांगितले की न्याय व्यवस्थेची सुद्धा सरकार कदर करत नाही. मात्र, याकडे कानाडोळा केला जात आहे. दिल्लीत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येणा-या लोकांची अडवणूक करण्यात येत आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. याचबरोबर, देशात कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करून बँका बुडविणारे देश सोडून पळून जात आहेत. अशा बँकांना वाचविण्यासाठी सर्व सामान्यांच्या खात्यातील पैसे बँकेच्या भागभांडवलात कोणतीही सूचना न देता वळती करण्याचा कायदा या देशात आणण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर केला.  

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMaharashtraमहाराष्ट्र