शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना कुठला पक्ष पाठीशी घालत असेल तर...; उदय सामंतांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 21:49 IST

सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. हा पहिल्यांदाच झाला, असे नाही. यापूर्वीही कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे काढण्याचे काम झाले होते.

शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) अपमान ही क्षुल्लक गोष्ट असल्याचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तर भविष्यात याचे कर्नाटकात आणि महाराष्ट्रातील निवडणुकीत मतदार उत्तर देतील. जर महाराजांचा अपमान करणाऱ्यांना कुठलाही पक्ष पाठीशी घालत असेल, तर तो पक्ष देशात ठेवायचा की नाही, हे आता मतदार ठरवतील, असे म्हणत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे.

सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. हा पहिल्यांदाच झाला, असे नाही. यापूर्वीही कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे काढण्याचे काम झाले होते. याचा मी जाहीर निषेध करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना यासंदर्भात पत्र लिहून आवाहन केले आहे की, कर्नाटक सरकारला सांगून जे कोणी समाजकंटक आहे, त्यांच्यावर तातडीने  कारवाई व्हायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. संपूर्ण देशाचा अपमान आहे. यावर कारवाई व्हायलाच हवी.

नारायण राणेंना टोला -विकास कामांच्या भूमिपूजनासाठी परस्पर विरोधी जर एकाच व्यासपीठावर येत असतील, तर ती महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, असं मला वाटतं. समोरासमोर आल्यावर एकमेकांवर टीका करायची, असे काही होऊ शकत नाही. महाराष्ट्राला ही राजकिय परंपरा आहे. पण काही लोक ही परंपरा विसरले आहेत, असे म्हणत सामंत यांनी यावेळी नारायण राणे यांनाही टोला लगावला. 

याच बरोबर, पेपर फुटीसंदर्भात सर्व लोकांना अटक झाली आहे आणि त्यातून कुणीही सुटणार नाही. सरकार आपले काम करत आहे, असेही सामंत म्हणाले.

“आंतर भारती" आणि "ग्राममंगल" आयोजित समारंभात 'ग्राममंगल' या संस्थेच्या कार्याची ४० वर्षे व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांच्या वयाची ८० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान सामंत पत्रकारांशी बोलत होते. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजKarnatakकर्नाटकBJPभाजपा