शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

"जर कोणत्या मंत्र्यांने चांगली कामगिरी केली नाही, तर..."; प्रताप सरनाईक काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 16:29 IST

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही जणांना अडीच वर्षासाठीच संधी दिली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांनी एक विधान केले आहे.  

'आम्ही लोकांनी असं ठरवलं आहे की, काहींना अडीच वर्षांसाठी संधी द्यायची', असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी केले. त्यांच्या या भूमिकेबद्दल बोलताना शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेतही अशा पद्धतीने निर्णय होईल, असे म्हटले आहे. चांगली काम केले नाही, तर गच्छंती अटळ आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले. 

मंत्रि‍पदाची शपथ घेण्यापूर्वी प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदेंचे आभार मानले. ते म्हणाले, "एकनाथ शिंदेंनी माझा विचार केला, त्याबद्दल पक्षाचे प्रमुख म्हणून मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पक्ष संघटना वाढवायची आहे. पक्ष कसा मोठा होईल, पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कसा न्या मिळेल, यासाठी प्रयत्न करणार आहे."

अजित पवारांच्या अडीच वर्ष मंत्रिपदाच्या भूमिकेवर प्रताप सरनाईकांनी भाष्य केले.  

प्रताप सरनाईक काय म्हणाले?

सरनाईक म्हणाले, "चांगलं काम करणार नसेल, तर त्यांच्या पक्षाचे प्रमुख म्हणून ते करतील. आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून शिंदे साहेबही करतील. जर चांगली कामगिरी कुठल्या मंत्र्यांने केली नाही आणि कार्यकर्त्यांना न्याय दिला नाही, मोठं केलं नाही. कार्यकर्त्यांना संजीवनी मिळाली नाही, तर निश्चितपणे त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. आमच्या पक्षातही तेच होणार आहे. जर कोणत्या मंत्र्यांने चांगली कामगिरी केली नाही, तर त्याची गच्छंती अटळ आहे", असे प्रताप सरनाईक म्हणाले. 

अजित पवार काय म्हणालेले?

नागपूरमध्ये झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "सगळ्यांनाच वाटतं की आपल्याला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी. जागा मर्यादित असतात, सगळेच ताकदीचे असतात. पण ज्यावेळी आपण सरकारमध्ये गेलो त्यावेळी काहींना दीड वर्षाची कारकिर्द मिळाली आहे. या पाच वर्षाच्या कारकि‍र्दीमध्ये साधारणपणे आम्ही लोकांनी असं ठरवलं आहे की, काहींना अडीच वर्षांसाठी संधी देण्यात येणार आहे. म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्यामध्ये सामावून घेतले जातील. अनेक जिल्ह्यांना प्रतिनिधित्व मिळेल. तिघांमध्येही याबाबत एकवाक्यता झालेली आहे याची कृपया नोंद घ्यावी."

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahayutiमहायुतीpratap sarnaikप्रताप सरनाईकEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना