५६ इंच छाती असेल तर कुलभूषण यांची सुटका करा!

By Admin | Updated: April 13, 2017 00:39 IST2017-04-13T00:39:45+5:302017-04-13T00:39:45+5:30

माजी नौदल अधिकारी व महाराष्ट्राचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तान सरकारने अटक केली. कोणताही पुरवा नसताना त्यांना फाशीची शिक्षाही

If 56 inch chest, release Kulbhushan! | ५६ इंच छाती असेल तर कुलभूषण यांची सुटका करा!

५६ इंच छाती असेल तर कुलभूषण यांची सुटका करा!

नागपूर : माजी नौदल अधिकारी व महाराष्ट्राचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तान सरकारने अटक केली. कोणताही पुरवा नसताना त्यांना फाशीची शिक्षाही सुनावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ५६ इंच छाती असेल तर त्यांनी शिष्टमंडळासह पाकिस्तानात जाऊन जाधव यांची सुटका करावी, असे आव्हान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी दिले.
जाधव यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने तात्काळ ठोस प्रयत्न करावे म्हणून प्रदेश काँग्रेसतर्फे राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबविली जात आहे. व्हेरायटी चौकात
आयोजित कार्यक्रमात चव्हाण यांच्याहस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
पंतप्रधान लग्नसमारंभासाठी पाकिस्तानात जातात. मग शिष्टमंडळासह पाकिस्तानात जाऊन त्यांनी जाधव यांना भारतात परत आणावे, अशी देशातील नागरिकांची भावना आहे. (प्रतिनिधी)

Web Title: If 56 inch chest, release Kulbhushan!