‘तत्काळ’साठी ओळखपत्राची अट शिथिल
By Admin | Updated: July 20, 2015 23:03 IST2015-07-20T23:03:21+5:302015-07-20T23:03:21+5:30
१ सप्टेंबरपासून अंमलबजावणी ; रेल्वे प्रवाशांना दिलासा.

‘तत्काळ’साठी ओळखपत्राची अट शिथिल
अकोला : रेल्वे प्रवासासाठी तत्काळ आरक्षण करण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य होते; पण रेल्वे मंत्रालयाने ही अट शिथिल केली असून, यापुढे प्रवाशांना तत्काळ तिकीट काढण्यासाठी ओळखपत्राची गरज भासणार नाही. या निर्णयाची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून होणार असून, यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. प्रवाशांना तत्काळ तिकीट काढण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य होते. त्यासाठी प्रवाशांना ओळखपत्राच्या झेरॉक्सप्रती आणि ओळखपत्रावरील क्रमांक अर्जावर अंकित करावा लागत होता. इंटरनेटद्वारे तत्काळ तिकीट आरक्षित करताना प्रवाशांना आपल्या ओळखपत्राची प्रत, तसेच त्यावरील क्रमांक नोंदवावा लागत होता. तत्काळकरिता या अटी येत्या १ सप्टेंबरपासून शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रस्तावित सुधारणेनुसार तत्काळ तिकीट काढणार्या प्रवाशांना प्रवासादरम्यान ओळखपत्र सोबत असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तिकीट कलेक्टरच्या पडताळणीदरम्यान ते सादर न करू शकल्यास ह्यत्याह्ण तिकिटावर प्रवास करणार्या सर्व प्रवाशांकडून संपूर्ण प्रवास भाडे आकारले जाईल. त्यामुळे तत्काळ योजनेचा लाभ घेणार्यांना यापुढे प्रवासादरम्यान निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, मोटार वाहनचालक परवाना, केंद्र किंवा राज्य शासनाचे ओळख प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, लॅमिनेटेड फोटोसहित बँकांद्वारा दिले जाणारे क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, राज्य किंवा केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतर्गत, जिल्हा किंवा स्थानिक प्रशासनाद्वारा वितरित ओळखपत्रांपैकी एकाची मूळप्रत सोबत अनिवार्य राहणार आहे.
*एजंटांना पुन्हा सुगीचे दिवस?
तत्काळकरिता ओळखपत्राची अट शिथिल केल्यामुळे पूर्वीप्रमाणेच एजंटांना सुगीचे दिवस येण्याची भिती भुसावळ मंडळ अधिकार्यांनी व्यक्त केली. जीआरपी व आरपीएफ पोलिसांना आरक्षण खिडक्यांवर अधिक सतर्क राहावे लागणार आहे. इंटरनेटवर ऑनलाईनच्या माध्यमातून तत्काळ तिकिटांचा काळाबाजार होण्याची अधिक शक्यता असल्याची बाब अधिकार्यांनी स्पष्ट केली.