इतर गावांसाठी आदर्श धामणेरमध्ये प्रशिक्षण केंद्र काम !
By Admin | Updated: May 19, 2017 14:25 IST2017-05-19T14:25:13+5:302017-05-19T14:25:13+5:30
राज्यातल्या उत्तमातील उत्तम गाव ठरणाऱ्या धामणेरकरांनी अन्य गावांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे.

इतर गावांसाठी आदर्श धामणेरमध्ये प्रशिक्षण केंद्र काम !
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 19 - राज्यातल्या उत्तमातील उत्तम गाव ठरणाऱ्या धामणेरकरांनी अन्य गावांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. मी निश्चितपणे केंद्र शासनाला विनंती करुन हे प्रशिक्षण केंद्र धामणेरमध्ये होण्यासाठी मी प्रयत्न करेन. गावाच्या पाठीमागे निश्चितपणे शासन उभं राहील, असे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कोरेगाव तालुक्यातील धामणेर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची पाहणी केली. यावेळी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधिक्षक संदीप पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी करुन कम्युनिटी बायोगॅस प्रकल्पाचीही पाहणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. यानंतर ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, गावाने गरिबातल्या गरिबाचाही विचार केला आहे.
2022 पर्यंत देशातल्या प्रत्येक गरीबाला घर मिळालं पाहिजे ही प्रधानमंत्री यांची संकल्पना इथे साकार होत आहे. जिल्ह्यातील 7 हजार घरे आम्ही बांधायला घेतली आहेत. पंडित दिनदयाल उपाध्याय योजना घरकुलांसाठी आणली आहे. त्यामधून 50 लाखाचे अनुदानही दिले जाते. शासनाची योजना उत्तमपणे यशस्वी केवळ ग्रामस्थांच्या पाठबळावरच होत असते.