बंदुकीच्या गोळीने विचार संपत नाहीत...

By Admin | Updated: August 20, 2015 23:24 IST2015-08-20T23:24:27+5:302015-08-20T23:24:27+5:30

‘सॉक्रेटिस ते दाभोलकर-पानसरे व्हाया तुकाराम’

The idea of ​​a gunshot shot does not end ... | बंदुकीच्या गोळीने विचार संपत नाहीत...

बंदुकीच्या गोळीने विचार संपत नाहीत...

 कोल्हापूर : दाभोलकर, पानसरे यांना गोळ्या घालून ही चळवळ थांबणार नाही, तर उलट त्यांच्या बलिदानाचं स्मरण ठेवून ती दुप्पट जोमानं पुढं चालणार आहे. धर्मचिकित्सेचा आणि शोषित-वंचितांचा लढा यापुढंही सुरूच ठेवण्याचा विचार मांडणारे ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर-पानसरे व्हाया तुकाराम’ हे रिंगणनाट्य गुरुवारी रंगले. निमित्त होते, शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित प्रेरणादिन कार्यक्रमाचे. शाहू मैदान येथील गायन समाज देवल क्लब येथे या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला दोन वर्षे झाली तरी अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात यश आलेले नाही, या गोष्टीबद्दल संताप व्यक्त करण्यासाठी समितीच्या वतीने या रिंगणनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. नाटकात संघसेन जगतकर, कृष्णात कोरे, प्रमोद शिंदे, अनिल शेलार, इंद्रायणी पाटील, अमित कांबळे यांनी भूमिका केली आहे. याप्रसंगी नाट्याचे लेखक राजाभाऊ शिरगुप्पे म्हणाले, डॉ. दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी साऱ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. विचारांच्या या लढाईत समाजातील प्रत्येक घटक सक्रिय सहभागी झाला पाहिजे; कारण संस्कृतीला लागलेला व्हायरस संपवायचा असेल तर सक्रिय सहभाग ही भविष्यातील खरी गरज आहे. यावेळी महापौर वैशाली डकरे, अरूंधती महाडिक, ज्येष्ठ रंगकर्र्मी डॉ. शरद भुताडिया, मेघा पानसरे, प्रा. विजय पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सुनील स्वामी, प्रा. प्रकाश भोईटे, पी. डी. पाटील, कृष्णात कोरे, सीमा पाटील, अरुण पाटील, बाळासाहेब कांबळे, कपिल मुळे, प्रमोद म्हेत्रे, सचिन ओतारी, उमेश सूर्यवंशी, माणिक यादव, प्रकाश हिरेमठ, अनिल चव्हाण, आदी उपस्थित होते. सुजाता म्हेत्रे यांनी आभार मानले. ---------------------------------------------- असे आहेत विजेते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. निबंध स्पर्धेत अनुक्रमे पूजा नारायण कुंभार, विकास शिवाजी मोरे, सुजाता सुरेश गुरव यांनी बक्षिसे मिळविली. पथनाट्य स्पर्धेत किंगमेकर ग्रुप, घाळी कॉलेज (गडहिंग्लज), कलारंग, भारती विद्यापीठाच्या संघांनी बक्षिसे मिळविली. वक्तृत्व स्पर्धेत सुनील पारके, रोहन आदमापुरे, राहुल देसाई यांनी पारितोषिके पटकावली.

Web Title: The idea of ​​a gunshot shot does not end ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.