आयसीएसईचा आज निकाल
By Admin | Updated: May 18, 2015 04:21 IST2015-05-18T04:21:51+5:302015-05-18T04:21:51+5:30
द कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई) बोर्डामार्फत घेण्यात आलेल्या आयसीएसई दहावी आणि आयसीएस

आयसीएसईचा आज निकाल
मुंबई : द कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई) बोर्डामार्फत घेण्यात आलेल्या आयसीएसई दहावी आणि आयसीएस बारावी बोर्डाचा निकाल सोमवार, १८ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आॅनलाइन निकाल पाहता येणार आहे.
आयसीएसई परीक्षेला सुमारे १ लाख ५९ हजार, तर आयएससी बोर्डातून ७० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या ६६६.ू्र२ूी.ङ्म१ॅ संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. युनिक नंबरशिवाय विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार
नाही. (प्रतिनिधी)