आयसीएसई, आयएससीचा निकाल ६ मे रोजी
By Admin | Updated: April 30, 2016 04:52 IST2016-04-30T04:52:47+5:302016-04-30T04:52:47+5:30
दहावी (आयसीएसई) आणि बारावी (आयएससी)चा निकाल ६ मे रोजी जाहीर होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १२ दिवस आधी हा निकाल लागणार आहे.

आयसीएसई, आयएससीचा निकाल ६ मे रोजी
मुंबई : दहावी (आयसीएसई) आणि बारावी (आयएससी)चा निकाल ६ मे रोजी जाहीर होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १२ दिवस आधी हा निकाल लागणार आहे.
कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट इक्झामिनेशन (सीआयएससीई) अंतर्गत दहावी, बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. यंदा दहावीची परीक्षा २९ फेब्रुवारी ते ३१ मार्च तर बारावीची परीक्षा ८ फेब्रुवारी ते ८ एप्रिल या कालावधीत पार पडली होती. गेल्या वर्षी १८ मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. तर यंदा तब्बल १२ दिवस आधी निकाल लागणार आहे. विद्यार्थ्यांना ६ मे रोजी दुपारी ३ वाजता निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. शिवाय एसएमएसद्वारेही निकाल मिळेल. (प्रतिनिधी)