शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आयसीएसई आणि आयएसई परीक्षा; ठाण्याची इप्सिता भट्टाचार्य बारावीत देशात पहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 06:19 IST

दहावीत उपाध्ये, सरदेसाई, शहा, भासैन ठरले टॉपर्स...

मुंबई : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएसई) या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) आणि आयएसई (बारावी) या परीक्षांचे निकाल रविवारी जाहीर झाले. दोन्ही परीक्षांमध्ये मुंबई आणि ठाण्याच्या विद्यार्थ्यांनी देशभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. निकालांमध्ये यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. दहावी बोर्डाचा निकाल ९८.९४ टक्के, तर बारावी बोर्डाचा निकाल ९६.९३ टक्के लागला आहे. आयसीएसई (दहावी) परीक्षेत बॉम्बे स्कॉटिश स्कूलची श्रेया उपाध्ये, चॅम्पियन स्कूल, मुंबईचा अद्वय सरदेसाई, कपोल इंटरनॅशनल स्कूलचा तनय शहा आणि ठाण्यातील सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलचा यश भासैन या चौघांनी ९९.८० टक्के गुण मिळवीत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे, तर सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलची इप्सिता भट्टाचार्य ही बारावी परीक्षेत देशात पहिली आली आहे. तिला ९९.७५ टक्के गुण मिळाले आहेत. दोन लाख ३७ हजार ६३१ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षादेशभरातून दोन लाख ३७ हजार ६३१ विद्यार्थ्यांनी आयसीएसई (दहावी) परीक्षा दिली. त्यात ९८.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर आयएसई (बारावी) परीक्षेसाठी ९८ हजार ५०५ विद्यार्थी बसले होते. त्यातील ९६.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

दहावी, बारावीत मुलींचीच सरशीआयसीएसई (दहावी) बोर्डात ९९.२१ टक्के मुली, तर ९८.७१ टक्के मुले उत्तीर्ण झाली. आयएसई (बारावी) बोर्डामध्ये देखील मुलींची सरशी झाली आहे. बारावीत ९८.०१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर मुलांचे उत्तीर्णांचे प्रमाण ९५.९६ टक्के आहे. बारावी बोर्ड परीक्षेत देशातून पाच विद्यार्थी पहिल्या रँकवर आले आहेत, तर दहावी बोर्ड परीक्षेत नऊ विद्यार्थी पहिल्या रँकवर आहेत.

पुनर्तपासणी २१ मेपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत काही आक्षेप असल्यास ते पुन्हा तपासणीसाठी अर्ज करू शकतात. ही सुविधा रविवारी दुपारी तीन वाजता सुरू होईल आणि २१ मेपर्यंत उपलब्ध राहील. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मखिजा महाराष्ट्रात प्रथमश्रीमती सुलोचना देवी सिंघानिया शाळेची कीर्ती मखिजा ९९.२५ टक्के मिळवून महाराष्ट्रात प्रथम, तर अनन्या शिदोरे आणि मयांक अगरवाल हे दोघेही ९९ टक्के मिळवून महाराष्ट्रात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. 

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाEducationशिक्षणStudentविद्यार्थीSSC Resultदहावीचा निकाल