शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

आयकॉन्सची यशोगाथा प्रेरणादायी

By admin | Updated: September 5, 2014 02:38 IST

‘लोकमत’ने प्रकाशित केलेले आयकॉन्स ऑफ सोलापूर’ हे कॉफी टेबल बुक अतिशय देखणो असून, यामध्ये समाविष्ट असलेल्या आयकॉन्सनी शून्यातून विश्व निर्माण केले.

‘लोकमत आयकॉन्स ऑफ सोलापूर’च्या प्रकाशन सोहळ्यात उज्ज्वल निकम यांचे गौरवोद्गार : विजय दर्डा म्हणाले, देश घडविणा:यांचा केला सन्मान!
 
सोलापूर : ‘लोकमत’ने प्रकाशित केलेले आयकॉन्स ऑफ सोलापूर’ हे कॉफी टेबल बुक अतिशय देखणो असून, यामध्ये समाविष्ट असलेल्या आयकॉन्सनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांची यशोगाथा युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार विशेष सरकारी वकील उज्‍जवल निकम यांनी गुरुवारी येथे काढले. अॅड. निकम यांच्या हस्ते शानदार समारंभात पुस्तकाचे प्रकाशन झाले.
‘आयकॉन्स ऑफ सोलापूर’मध्ये जिल्ह्यातील उद्योग, राजकारण, समाजकारण, साहित्य, कला क्षेत्रतील आदर्श व्यक्तींनी संघर्ष करत मिळवलेल्या यशाचा धांडोळा घेण्यात आला आहे. ‘लोकमत’ने अतिशय कल्पकतेने निर्माण केलेल्या या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन समारंभासाठी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे चेअरमन आणि एडिटर इन चीफ खासदार विजय दर्डा आवजरून येथे आले होते. ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, युनिटी मल्टिकॉन्सचे कफील मौलवी, स्वप्निल डेव्हलपर्सचे अमोल सोनकवडे, ‘लोकमत’च्या सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने, सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे उपस्थित होते. अॅड. निकम म्हणाले, सोलापुरातील कर्तबगारांचा शोध घेणारे हे पुस्तक प्रकाशित करताना मला विशेष आनंद होत आहे. वकिली व्यवसायामुळे माझा प्रसारमाध्यमांशी संबंध आहे. वृत्तपत्र चालविणो हा व्यवसाय आहे आणि पत्रकारिता हा धर्म आहे. हा व्यवसाय करताना ‘लोकमत’ने त्याचा धंदा होऊ दिला नाही. ‘लोकमत’ने आजवर समाजमन सुसंस्कृत करणा:या बातम्या देऊन प्रगतीची घोडदौड केली, याबद्दल खासदार दर्डा यांचे मी कौतुक करतो.
खासदार दर्डा म्हणाले, ‘लोकमत’च्या युवा पिढीने ‘आयकॉन्स ऑफ सिटीज्’ची कल्पना मांडली आणि ती सत्यात उतरवली. या तरुण भारतास यंग इंडिया बनविण्याचे काम समाजातील अनेक मान्यवरांनी केले. त्यांचा सन्मान झाला पाहिजे. इतिहासात त्यांची नोंद झाली पाहिजे, या उद्देशाने हा उपक्रम राबविला. पुणो, मुंबई, औरंगाबादनंतर आज आयकॉन्स ऑफ सोलापूरचे प्रकाशन होत आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या,  आयुष्यात जी व्यक्ती प्रेरणा देत असते, तीच खरी आयकॉन असते. युवा पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी समाजाला आयकॉनची गरज आहे. ‘लोकमत’बरोबर मी गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे. मी ‘लोकमत’ युवा मंचची ब्रँड अॅम्बॅसिडरही होते, असेही त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)