शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

IAS Transfer : तुकाराम मुंढेंची अवघ्या महिन्याभरात बदली; राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्याही बदल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 18:28 IST

राज्य सरकारने तुकाराम मुंढेंसह 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत.

Maharashtra IAS Officer Transfer : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा एकदा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यावेळी सरकारने 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात प्रसिद्ध IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची महिन्याभरात दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे.  त्यांची मराठी भाषा विभाग, मंत्रालय, सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

राज्य सरकारने शुक्रवारी (ता. 2 जून) 20 भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या केल्या आहेत. यात प्रसिद्ध सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे. मागच्या महिन्यातच आयएसएस तुकाराम मुंढे यांची कृषी आणि पशुसंवर्धन विभागात अतिरिक्त सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता महिन्या भरातच त्यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे.  तुकाराम मुंढे यांची मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांचे आदेश राज्य सरकारने आज जारी केले आहेत.

कुणाची बदली कुठे?

1. सुजाता सौनिक, आयएएस (1987) मंत्रालय, मुंबई यांना ACS (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.2. एस. व्ही. आर. श्रीनिवास, आयएएस (1991) एमएमआरडीए, मुंबई यांना OSD, धारावी पुनर्विकास प्रकल्प, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.3. लोकेश चंद्र, आयएएस (1993) BEST, मुंबई यांची महाडिस्काॅम, मुंबईचे सीएमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.4. राधिका रस्तोगी, आयएएस (1995) यांची नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.5. आय ए. कुंदन, आयएएस (1996) महिला आणि बालकल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती दिली आहे.6. संजीव जयस्वाल, आयएएस (1996) पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांची सीईओ, म्हाडा, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.7. आशीष शर्मा, आयएएस (1997) एमसी, बीएमसी मुंबई यांना PS (2), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.8. विजय सिंघल, आयएएस (1997) महाडिस्काॅम मुंबई येथून जनरल मॅनेजर BEST, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.9. अंशु सिन्हा, आयएएस (1999) सीईओ, खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांची सचिव, OBC बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.10. अनुप कृ. यादव, आयएएस (2002) सचिव, अल्पसंख्याक विभाग. विभाग यांची सचिव, महिला आणि बालकल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.11. तुकाराम मुंढे, आयएएस (2005) यांची मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.12. डॉ. अमित सैनी, आयएएस (2007) सीईओ, MMB, मुंबई यांची मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.13. चंद्रकांत पुलकुंडवार, आयएएस (2008) एमसी, नाशिक एमसी, नाशिक यांची साखर आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.14. डॉ. माणिक गुरसाल, आयएएस (2009), अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) यांची मरीटाईम बोर्ड ( Maritime Board) सीइओ मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.15. कादंबरी बलकवडे, आयएएस (2010) कोल्हापूर यांची, मेडा पुणे येथे डिजी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.16. प्रदिपकुमार डांगे, आयएएस (2011) जाईंट सेक्रेटरी मिशन डायरेक्टर SBM (ग्रामीण), पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग. मंत्रालय, मुंबई यांना संचालक, रेशीम, नागपूर या पदावर नियुक्त केले आहे.17. शंतनू गोयल, आयएएस (2012) आयुक्त, (MGNREGS) नागपूर यांची सिडको, नवी मुंबई सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.18. पृथ्वीराज बी.पी., आयएएस (2014) जिल्हाधिकारी, लातूर यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.19. डॉ. हेमंत वसेकर, आयएएस (2015) सीईओ,(NRLM) मुंबई यांची आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.20. डॉ. सुधाकर शिंदे, आयआरएस (1997) यांची एएमसी, बीएमसी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस