आयएएस सावंतवर बलात्काराचा गुन्हा!

By Admin | Updated: March 21, 2015 02:05 IST2015-03-21T02:05:28+5:302015-03-21T02:05:28+5:30

अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करणारा आयएएस अधिकारी मारोती हरी सावंत (५८) याच्यावर पोलिसांनी बलात्काराचाही गुन्हा दाखल केला आहे.

IAS Sawant gang raped! | आयएएस सावंतवर बलात्काराचा गुन्हा!

आयएएस सावंतवर बलात्काराचा गुन्हा!

पुणे/ मुंबई : अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करणारा आयएएस अधिकारी मारोती हरी सावंत (५८) याच्यावर पोलिसांनी बलात्काराचाही गुन्हा दाखल केला आहे. तो एका तेरा वर्षीय मुलीवर तीन वर्षांपासून बलात्कार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यायालयाने त्याला ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्याला तात्काळ निलंबित करण्यात आल्याचे महसूल व कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत काशीद यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचा महासंचालक असलेल्या सावंत याला गुरुवारी अटक करण्यात आली. त्याने इयत्ता दुसरीतील दोन आणि सातवीतील तीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. सातवीतील तेरा वर्षांच्या मुलीवर तो तीन वर्षांपासून बलात्कार करत होता, अश्लील सीडीही दाखवीत होता. सावंत याने हिंगणे परिसरातील सासऱ्याच्या मालकीच्या सदनिकेत हा घृणास्पद प्रकार केला. मुलींनी शाळेत समुपदेशनादरम्यान या गैरप्रकाराची माहिती दिली होती.
विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश मंगला धोटे यांच्या कोर्टासमोर सावंत याला हजर करण्यात आले. सावंतवर कलम ३७६, ३५४ (अ)(ब), ५०६, बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ४, ६, ८ आणि १०, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ (अ), (ब), अ‍ॅट्रासिटी कायदा कलम ३(१),(११)(१२), ३ (२)(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पीडित मुलींवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय चाचणी अहवालात स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बलात्काराचाही गुन्हा दाखल केला.

च्सावंतला शुक्रवारी दुपारी पुण्याच्या न्यायालयात आणण्यात आले होते. त्यावेळी मनसेच्या नगरसेविकांनी त्याला चपलांचा हार घातला. त्यानंतर या नगरसेविकांना अटक करून संध्याकाळी त्यांची सुटका करण्यात आली.

तात्काळ निलंबन
पुण्यात घडलेल्या या निंदनीय घटनेवर विधानसभेत अनेक सदस्यांंनी औचित्याच्या मुद्याद्वारे सरकारचे लक्ष वेधले. सावंत हा आयएएस अधिकारी असल्याचे या प्रकरणाचे गांभीर्य जास्त आहे. त्यामुळे सरकारने यावर त्वरीत निवेदन करावे, अशी मागणीही सदस्यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना महसूल व कृषी मंत्री खडसे यांनी सावंत यास तात्काळ निलंबित करण्यात आल्याची घोषणा केली.

Web Title: IAS Sawant gang raped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.