शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पूजा खेडकरला खोलीत बोलावले का? "तिच्याशी तीन वेळा भेट झाली पण..." आरोपांवर पुणे जिल्हाधिकारी बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 11:00 IST

IAS Pooja Khedkar news: कोर्टात सुनावणीवेळी खेडकरांनी लैंगिक छळाची तक्रार दिली म्हणून आपल्याला टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला होता. यावर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया आली आहे. 

वादग्रस्त आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर यांचे आयएएस पद युपीएससीने रद्द केले आहे आणि आजिवन परीक्षा देण्यास बंदी घातली आहे. पूजा खेडकर यांना लवकरच अटक होण्याची देखील शक्यता आहे. असे असताना अटकपूर्व जामिनासाठी खेडकर यांनी दिल्लीच्या पटियाला कोर्टात अर्ज केला आहे. या सुनावणीवेळी खेडकरांनी लैंगिक छळाची तक्रार दिली म्हणून आपल्याला टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला होता. यावर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया आली आहे. 

पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकरांचे हे आरोप खोडून काढले आहेत. दिवसे यांनी मला खोलीत बोलावले होते, परंतु मी नकार दिला, असा दावा पूजा खेडकरने केला होता. यावर दिवसे यांनी सांगितले की, पूजा हिने केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. सर्व आरोप रचलेले आहेत. खेडकर या ३ ते १४ जून पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधीत होत्या. यावेळी पूजा खेडकर यांना मोजून तीनवेळा भेटलो. या सर्व भेटी प्रशासकीय होत्या. यावेळी अन्य अधिकारी आणि वकील देखील उपस्थित होते, असे दिवसे म्हणाले. 

या काळात कधीही मी पूजा यांना एकटा असताना भेटलो नाही किंवा त्यांच्याशी एकटा असताना चर्चा केली नाही. १४ जूननंतर त्यांना विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात जाण्यास सांगण्यात आले, तिथे पोस्टिंग होताना पूजाने कोणताही आरोप केला नाही. राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात, माझ्या पत्राच्या उत्तरात तिने असा कोणताही आरोप केलेला नाही. जेव्हा तिला वाशिमला पाठविण्यात आले तेव्हा तिने जाणूनबुजून आशा प्रकारचे आरोप केले आहेत. तिने असे का केले हे सर्व जाणत आहेत, असेही दिवसे यांनी स्पष्ट केले. 

पूजा खेडकर हिच्या चमकोगिरीवरून आवाज उठल्यावर तिची बदली वाशिमला करण्यात आली होती. तिथे बनावट प्रमाणपत्रे, नाव बदलून युपीएससी परीक्षा देणे, वडिलांची अवैध संपत्ती आदी गोष्टी विरोधात जात असल्याचे पाहून दिवसे यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दिली होती. युपीएससीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे. यामुळे ती वाशिममधून बेपत्ता झाली आहे. तिचे वकील दिल्लीतील न्यायालयात तिला अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :ias pooja khedkarपूजा खेडकरupscकेंद्रीय लोकसेवा आयोगfraudधोकेबाजीPuneपुणे