मला सिंधुदुर्गच्या पर्यटनाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व्हायला आवडेल- जॉकी श्रॉफ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 10:23 PM2017-09-10T22:23:52+5:302017-09-10T22:26:10+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी अनेक वेळा आलो आहे. येथे निसर्गाचा खरा खजिना पर्यटनात आहे. त्यामुळे या निसर्गाचा फायदा पुढील पिढीला होणे गरजेचे आहे. त्यासाठी मला येथील पर्यटनवाढीसाठी सिंधुदुर्ग ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व्हायला नक्कीच आवडेल, असे मत प्रसिद्ध  अभिनेते जॉकी श्रॉफ यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. ते सावंतवाडी येथे बोलत होते.

I would like to be a brand ambassador for Sindhudurg tourism - Jockey Shroff |  मला सिंधुदुर्गच्या पर्यटनाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व्हायला आवडेल- जॉकी श्रॉफ

 मला सिंधुदुर्गच्या पर्यटनाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व्हायला आवडेल- जॉकी श्रॉफ

Next

अनंत जाधव
सावंतवाडी, दि. 10 - सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी अनेक वेळा आलो आहे. येथे निसर्गाचा खरा खजिना पर्यटनात आहे. त्यामुळे या निसर्गाचा फायदा पुढील पिढीला होणे गरजेचे आहे. त्यासाठी मला येथील पर्यटनवाढीसाठी सिंधुदुर्ग ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व्हायला नक्कीच आवडेल, असे मत प्रसिद्ध  अभिनेते जॉकी श्रॉफ यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. ते सावंतवाडी येथे बोलत होते.

अभिनेता जॉकी श्रॉफ यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर व दिग्दर्शक महावीर जैन यांच्यासमवेत रेडीतील यशवंतगड, सावंतवाडीतील राजवाडा, शिल्पग्राम, हेल्थफार्म, सार्वजनिक गणपती मंदिराला भेट दिली. अभिनेता जॉकी श्रॉफ म्हणाले, मी अनेक वेळा सिंधुदुर्गामध्ये आलो आहे. दोडामार्गपासून विजयदुर्गपर्यंत सर्व ठिकाणच्या पर्यटनाचा आनंदही लुटला आहे.सिंधुदुर्ग माझ्या आवडीचे ठिकाण असून, येथे मला चित्रपटाचे चित्रीकरण करण्यास आवडेल, असे त्यांनी सांगितले. येथील हवा भरपूर शुद्ध आहे. समुद्रकिनारे तर भरपूर स्वच्छ आहेत. प्रत्येकाने स्वत:च्या घरासारखी काळजी घ्यावी. तरच आम्ही आणखी जास्त काळ येथील निसर्ग टिकवून ठेवू शकतो.
आंबोलीतील धबधबे बघून मला अतिशय आनंद होत आहे. देवबाग तसेच तारकर्ली-मोचेमाड येथील बीच तर आनंददायी आहेत. फक्त आपण याचा वापर कसा करून घेतो त्यावर आहे. बाजूचे गोवा राज्य हे पर्यटनामध्ये पुढे आहे. पण त्यापेक्षा अधिकचे पर्यटन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. मी सकाळपासून आरोंदा येथील बॅक वॉटर पाहिला. तसेच रेडीतील यशवंत गड बघितला आहे. त्यानंतर आणखी पर्यटनाचे काही प्रकल्प पाहणार आहे. त्यानंतर येथे काय करायचे ते ठरविले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. निसर्गाचा हा खजिना बघून माझा काही तरी येथे वापर करून सरकारने घ्यावा. माझ्या शरीराचा वापर जर या ठिकाणच्या उत्कर्षाला होत असेल, तर कधीही मी ते द्यायला तयार आहे. मला या ठिकाणचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व्हायला नक्कीच आवडेल. पण हे सर्व सरकारच्या हातात आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी ठरविले तर होऊ शकते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राजवाडा बघून जॉकी भारवला
सावंतवाडीतील प्रसिद्ध असा राजवाडा बघून अभिनेता जॉकी श्रॉफ चांगलाच भारावून गेला. त्यांनी राजवाड्यातील गंजिफा खेळाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांच्याकडून माहितीही घेतली. यावेळी अभिनेता श्रॉफ यांनी राजे खेमसावंत भोसले, शुभदादेवी भोसले, लखनराजे भोसले यांच्याशी गप्प मारल्या. यावेळी अभिनेता जॉकी श्रॉफ यांनी आपल्या सिंधुदुर्ग सफारीला ही चांगलाच उजाळा दिला.

Web Title: I would like to be a brand ambassador for Sindhudurg tourism - Jockey Shroff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.