...तर मंत्रिपदाचा राजीनामा देईन!

By Admin | Updated: July 4, 2015 02:57 IST2015-07-04T02:57:41+5:302015-07-04T02:57:41+5:30

एका महिलेचा भूकबळी आपल्या मतदारसंघात झाल्याचा दावा विरोधकांकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात ही महिला आपल्या अर्जुनी मोरगाव मतदारसंघात नव्हे, तर तिरोडा येथे

... I will resign from the ministry! | ...तर मंत्रिपदाचा राजीनामा देईन!

...तर मंत्रिपदाचा राजीनामा देईन!

मुंबई : एका महिलेचा भूकबळी आपल्या मतदारसंघात झाल्याचा दावा विरोधकांकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात ही महिला आपल्या अर्जुनी मोरगाव मतदारसंघात नव्हे, तर तिरोडा येथे वास्तव्य करीत होती. शिवाय, ही महिला आजारी होती. या महिलेचा मृत्यू भुकेपोटी झाल्याचे निष्पन्न झाले तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे आव्हान सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी दिले.
या महिलेस दोन मुले असून, त्यापैकी एक १७ वर्षांचा गतिमंद आहे तर दुसरा अंध आहे. या दोन्ही मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारल्याचे बडोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या दोन्ही मुलांच्या नावे प्रत्येकी १ लाख रुपये बँकेत जमा केले असून, त्या रकमेतून त्यांचा दैनंदिन खर्च भागवला जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: ... I will resign from the ministry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.