शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

Suresh Dhas : मी प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही, माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे - सुरेश धस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 18:42 IST

Suresh Dhas And Prajakta Mali : प्राजक्ताच्या पत्रकार परिषदेनंतर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मी माफी मागणार नाही, माझ्यासाठी प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे" असं म्हटलं आहे

भाजपा आमदार सुरेश धस यांच्या विधानानंतर आता अभिनेत्री प्राजक्ता माळीने थेट पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाविषयी बोलताना धस यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. तसेच प्राजक्ता माळीचंही नाव घेतलं होतं. "प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे असं म्हटलं होतं. यानंतर प्राजक्ताने "सुरेश धस यांनी विनम्रपणे माझी माफी मागावी. मी आज महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी योग्य ती कारवाई करावी. मीदेखील कायदेशीर कारवाई करत राहीन" असं म्हटलं आहे. 

प्राजक्ताच्या पत्रकार परिषदेनंतर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मी प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही, माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे" असं म्हटलं आहे. तसेच निषेध म्हणून मी महाराष्ट्राची हास्यजत्रा बघायचं बंद करतो असंही म्हटलं. "मी माफी मागणार नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून, पाया पडून एक विनंती आहे की, या खून प्रकरणावरचं लक्ष तुम्ही कोणत्याही हिरो-हिरोईनकडे ढकलू नका. तुम्हाला माझी विनंती आहे. माझी आणि त्यांची नीट ओळखही नाही." 

"मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम पाहत असतो. जर त्यांनी माझा निषेध केला तर मी त्यांचा निषेध म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा बघायचं बंद करतो. माझं जे कालचं स्टेटमेंट आहे एसपी ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाईज करून पाहावं. त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कोणतीही बाब मी बोललेलो नाही. संतोष देशमुख हत्येपासून लक्ष डायव्हर्ट करण्याचा हा प्रकार आहे. इथून पुढे तुम्ही तो प्रश्न विचारू नका. माझ्या ठायी प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे" असं सुरेश धस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. 

सुरेश धस यांनी विनम्रपणे माझी माफी मागावी - प्राजक्ता माळी

"सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेल्या टिप्पणीचा मी निषेध करते. गेल्या दीड महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. मी या सगळ्याला शांतपणे सामोरी जातीय. पण, याला माझी मुकसंमती आहे असं नाही. मी विनंती करते तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी महिला कलाकारांची नावं घेणं बंद करा. हे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही. सुरेश धस यांनी विनम्रपणे माझी माफी मागावी. मी आज महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी योग्य ती कारवाई करावी. मीदेखील कायदेशीर कारवाई करत राहीन."

"मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी विनंती करते. माझी आई झोपलेली नाही. माझ्या भावाने सगळे सोशल मीडिया अकाऊंट्स डिलीट केलेत. माझ्या कुटुंबावरही याचा अत्यंत वाईट परिणाम होतोय. या सगळ्याला तोंड देणं हे अजिबात सोपं नाही. मुख्यमंत्र्यांनी मी विनंती करते की त्यांनी याबाबत ठोस कारवाई करावी. करुणाताईंना मी सांगू इच्छिते की तुम्ही स्वत: एक महिला आहात. महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता. या पुरुषप्रधान संस्कृतीत महिलाच महिलांच्या बाजूने उभ्या राहिल्या नाहीत आणि चिखलफेक करत राहिल्या तर कसं होणार? मी सांगू इच्छिते की तुम्हाला माझ्याबद्दल मिळालेली माहिती अत्यंत चुकीची आहे" असं प्राजक्ता माळीने म्हटलं आहे.  

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसPrajakta Maliप्राजक्ता माळीBeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडे