शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 12:39 IST

राज्याच्या माजी गृहमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत गोप्यस्फोट केला आहे

Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गुरुवारी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना अनिल देशमुख यांचा देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट केला. माजी पोलीस आयुक्त  परमबीर सिंह यांनी १०० कोटी घोटाळ्याचा आरोप केल्यामुळे अनिल देशमुख यांना एक वर्षापेक्षा जास्त वेळ तुरुंगात राहावं लागलं होतं. त्यानंतर जामीनावर देशमुख बाहेर आले. अशातच आता त्यांनी फडणवीसांवर आरोप करत आपण कोणताही समझोता केला नसल्याचे म्हटलं आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये आजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे एकाच हॉटेलमध्ये बुधवारी रात्री मुक्कामी होते. त्यामुळे तिघांनी एकमेकांच्या भेटी घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र तिघांनीही कोणतीही भेट न झाल्याचे म्हटलं. त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करणारे शपथपत्र तयार करुन आणायला सांगितले होते, असा गौप्यस्फोट देशमुखांनी केला. 

देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे माणूस पाठवला होता - अनिल देशमुख

"तब्बल १४ महिन्यांनी मी बाहेर आलो. त्यावेळी देवेंद्र फडणीस यांनी माझ्याकडे समझौता करण्यासाठी त्यांचा माणूस पाठवला होता. त्यांनी फोन करुन सांगितले की, तुम्ही मला एक शपथपत्र करुन द्या. जर ते दिलं तर तुमच्यावर ईडी, सीबीआयची कारवाई होणार नाही. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना सांगितले होते की, अनिल देशमुख जन्मभर तुमच्यासोबत समझौता करणार नाही. त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करुन अडचणीत आणा अशा प्रकारचे शपथपत्र तयार करुन आणायला सांगितले होते," असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला.

काळजी करू नका, योग्यवेळी मी सत्य बाहेर काढेल - देवेंद्र फडणवीस

"कपोलकल्पित सत्य अनिल देशमुख बोलत आहे. यासंदर्भात बरेच सत्य माझ्याकडे आहे. योग्यवेळी ते सत्य मी बाहेर काढेल. त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने सनसनी पसरवायची आहे. पण ज्यावेळी मी सत्य बाहेर काढेल त्यावेळी त्यांना लक्षात येईल. आज यापेक्षा जास्त काही बोलत नाही. जी काही घटना घडली तेव्हा ते सरकारमध्ये होते. तेव्हाच १०० कोटींचा घोटाळा झाला. त्यानंतर त्यांनी मला काय निरोप पाठवले हे सगळं माझ्याकडे आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Anil Deshmukhअनिल देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे