मी काँग्रेसचा, काँग्रेसमध्येच राहणार!
By Admin | Updated: July 1, 2014 01:51 IST2014-07-01T01:51:35+5:302014-07-01T01:51:35+5:30
दुस:या कोणत्याही पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दांत महसूल तथा पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी व्हॉटस्अॅपवर सुरू असलेल्या अफवांना उत्तर दिले.

मी काँग्रेसचा, काँग्रेसमध्येच राहणार!
>औरंगाबाद : मी काँग्रेसचा कार्यकर्ता असून काँग्रेसमध्येच राहणार आहे. दुस:या कोणत्याही पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दांत महसूल तथा पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी व्हॉटस्अॅपवर सुरू असलेल्या अफवांना उत्तर दिले.
औरंगाबादेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बाळासाहेब थोरात हे सात आमदारांसह भाजपामध्ये जाणार, अशी चर्चा काही दिवसांपासून व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून सुरू आहे. त्याला पुष्टी देण्यासाठी भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि बाळासाहेब थोरात यांच्या भेटीचे एक छायाचित्रही आहे.
याविषयी विचारले असता पालकमंत्री थोरात म्हणाले, भाजपात जाण्याबाबत केवळ अफवा उठविल्या जात आहेत. नितीन गडकरींसोबतचे छायाचित्रही शासकीय कार्यक्रमातील आहे. त्यात राजकीय असे काहीही नाही. त्या छायाचित्रत आमच्या दोघांमध्ये महसूल खात्याचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रीय हेही दिसत आहेत, असे थोरात यांनी निदर्शनास आणून दिले. (प्रतिनिधी)