शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut : मला कारागृहात अंडा सेलमध्ये ठेवलं गेलं, 10 किलो वजन कमी झालं; संजय राऊतांनी सांगितली जेलमधील आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 18:50 IST

राऊत म्हणाले, ‘मला वाचण्यासाठी अथवा लिहिण्यासाठी त्रास होत आहे. मला ऐकायला आणि बोलतानाही त्रास होत आहे. मला हे सहन करावे लागले पण ठीक आहे.‘

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात एका विशेष न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच जामीन दिला आहे. यानंतर आता, त्यांनी कारागृहातील आपली आपबिती सांगितली आहे. कारागृहात आपल्याला 'अंडा सेल'मध्ये ठेवण्यात आले होते. तेथे आपल्याला 15 दिवस ऊनही दिसले नाही. बराच वेळ जेलमधील फ्लडलाइट्सच्या संपर्कात राहिल्याने आता माझी दृष्टीही कमकुवत झाली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. एढेच नाही, तर जेलमधील काळात आपले 10 किलो वजन कमी झाल्याचेही राऊतांनी यावेळी सांगितले.

राऊत म्हणाले, ‘मला वाचण्यासाठी अथवा लिहिण्यासाठी त्रास होत आहे. मला ऐकायला आणि बोलतानाही त्रास होत आहे. मला हे सहन करावे लागले पण ठीक आहे.‘

राऊत स्वतःला म्हणाले 'युद्ध कैदी' -स्वतःला 'युद्धबंदी' म्हणत, राऊत यांनी दावा केला, की जर आपण त्यांच्यासमोर (BJP) आत्मसमर्पण केले असते अथवा ‘मूक दर्शक' बनून बसलो असतो, तर आपल्याला अटक केली गेली नसती. मी स्वतःला युद्ध कैदी समजतो, सरकारला वाटते, की आम्ही त्यांच्यसोबत यूद्ध करत आहोत.

राऊत म्हणाले, आपण महाराष्ट्राचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांना कारागृहात पाहिले. त्यांची प्रकृती ठीक नाही. सरकार केवळ विरोधी पक्षात असलेल्यांनाच कारागृहात टाकणार का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी आपण जे काही आहोत, ते बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबामुळेच आहोत, असेही राऊत यावेळी म्हणाले.

राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्यावर दिली अशी प्रतिक्रिया - संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे सुरू असलेल्या राजकारणावर शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. "महाराष्ट्रात येऊन वीर सावरकरांवर अशाप्रकारचे आरोप करणं  आणि त्यांची बदनामी करणं हे महाराष्ट्राला अजिबात मंजूर नाही. शिवसेना काय तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेतेही याचं समर्थन करणार नाहीत. राहुल गांधींनी असं वक्तव्य करण्याची काहीच गरज नव्हती. भारत जोडो यात्रा देशातील हुकूमशाही, महागाई, बेरोजगारी या महत्वाच्या प्रश्नांच्या विरोधात निघाली आहे. यात्रेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मग अशावेळी वीर सावरकरांचा मुद्दा आणण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाjailतुरुंगUddhav Thackerayउद्धव ठाकरे