शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

"ज्याने स्वतःच्या नातेवाईकांचा रक्तपात केला, त्या क्रूरकर्म्या औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांच्या..."; रोहित पवार भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 20:51 IST

आता रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत, "ज्याने स्वतःच्या रक्ताच्या नातेवाईकाचा रक्तपात केला त्या क्रूरकर्म्या औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते," असे म्हटले आहे. 

सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील 'छावा' या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या ऐतिहासिक चित्रपटाच्या माध्यमाने छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी आणि धर्मासाठी केलेले बलिदान अगदी कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत आहे. चित्रपट पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी येत आहे. त्यांचे बलिदान तरूण पिढीला प्रेणार देणारे आहे. सत्ता धाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वचजण या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. मात्र, यातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. "औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि म्यानमारपर्यंत होती. जीडीपी २४ टक्के होता. हे सर्व मी चुकीचे म्हणू का?" असा सवाल करत, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाची लढाई सत्तेसाठी होती. धर्मासाठी नव्हती," असेही अबू आझमी यांनी म्हटले होते. यानंतर, आता रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत, "ज्याने स्वतःच्या रक्ताच्या नातेवाईकाचा रक्तपात केला त्या क्रूरकर्म्या औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते," असे म्हटले आहे. 

काय म्हणाले रोहित पवार -सोशील मीडिया पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले, "ज्याने स्वतःच्या रक्ताच्या नातेवाईकाचा रक्तपात केला, त्या क्रूरकर्म्या औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. याच औरंगजेबाने आपला महापराक्रमी राजा छत्रपती संभाजी महाराज यांचा अनन्वित छळ करून खून केला, त्यांच्या अंगावरील भळभळणाऱ्या त्या जखमा आणि वेदनांनी संपूर्ण देशासह तमाम महाराष्ट्र आजही विव्हळत आहे. त्यामुळं औरंगजेब कुणासाठी पूजनीय असला तरी आमच्यासाठी मात्र तो स्वराज्याचा, महाराष्ट्राचा, देशाचा आणि मराठी माणसाचा कायम नंबर एकचा शत्रू राहील. इतिहासाचं पुस्तक न चाळता औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांचं मस्तक तपासण्याची गरज आहे."

"अबू आझमी नाक घासून माफी मागा…" - चित्रा वाघ - चित्रावाघ म्हणाल्या, "औरंग्या आणि त्याची एकंदरीतच वंशज भारतात पर्यटनासाठी आले नव्हते… त्यांनी  हिंदुस्थान लुटला… अनेक मंदिर उध्वस्त केली… लेकी बाळींची अब्रू लुटली आणि आमच्या धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे काय हाल केले हे सारं जग जाणतं आणि या औरंग्याच्या पिलावळीला तो विकासक वाटत असेल तर यांच्या नांग्या वेळीच ठेचायला हव्यात. अबू आझमी @abuasimazmi आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची नाक घासून माफी मागा…" 

नेमकं काय म्हणाले होते अबू आझमी?"औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि म्यानमारपर्यंत होती. त्या काळात आपला जो जीडीपी होता तो २४ टक्के होता. भारताला 'सोने की चिडिया' म्हटलं जात होतं. या सगळ्या गोष्टींना मी चुकीचं म्हणू का?" असा सवाल करत, "छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई ही सत्तेसाठी होती. ही लढाई धर्मासाठी होती, असे कुणी म्हणत असेल तर ते मी मानत नाही," असेही अबू आझमी यांनी म्हटले होते.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारChhaava Movie'छावा' चित्रपटAbu Azmiअबू आझमी