शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

Rohit Pawar:"दादा, माझं एका मुलावर प्रेम आहे, आम्हाला पळून जाययंच, तुम्हीच सांगा काय करू?” तरुणीनं रोहित पवारांकडे मागितला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 19:54 IST

Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी आज सोशल मीडियावरून संवाद साधला. यावेळी रोहित पवार यांनी त्यांच्या चाहत्यांनी विचारलेल्या राजकारणापासून ते इतर सर्व विषयांवरील प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी आज सोशल मीडियावरून संवाद साधला. यावेळी रोहित पवार यांनी त्यांच्या चाहत्यांनी विचारलेल्या राजकारणापासून ते इतर सर्व विषयांवरील प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. याचदरम्यान, एका तरुणीने रोहित पवार यांना विचारलेल्या एका प्रश्नाची सध्या चर्चा होत आहे.

या तरुणीने रोहित पवार यांना विचारलं की, दादा माझं एका मुलावर खूप प्रेम आहे आम्ही दोघे लग्न पण करणार आहोत. पण मुलाच्या घरचे आमच्या लग्नाला तयार होत नाही आहेत.  म्हणून आम्ही दोघांनी पळून जायचा निर्णय घेतला आहे. तुमच्या मते मी काय करू..? या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवान म्हणाले की, पळून जाण्यासाठी आई-वडीलांनी सहमती दिली असेल तर ते म्हणतात तसं नक्की करा!

यावेळी रोहित पवार यांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार यांच्याकडून कामाची प्रेरणा मिळते असे आपण सांगता. मात्र, कुटुंबातीलच अशा नेत्यांसोबत काम करताना कधी मनावर दडपण येते का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना रोहित पवार यांनी सांगितले की, सामान्य लोक साहेबांच्या धोरणांबाबत अंदाज बांधू शकतात. मात्र राजकीय लोकांनी साहेबांच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्नही करू नये. दडपण येतं! साहेबांसारखी legacy असेल तर नक्कीच येतं, असे त्यांनी सांगितले.

तर तुमचा बायोपिक करायचा झाला तर तुमच्या रोल बद्दल तुमची निवड कोण असेल. वैभव तत्ववादी की ललित प्रभाकर? असा प्रश्नही रोहित पवारांच्या एका चाहत्याने विचारला. त्याला उत्तर देताना रोहित पवार यांनी सांगितले की, माझा रोल मलाच करायला आवडेल. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारRelationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप