शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

त्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव मला समजलेय; उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांची आपबीती सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 13:41 IST

तुम्ही ज्या ज्या यंत्रणा आज वापरताय त्या सर्वांच्या आई-बापांना, नातेवाईकांना आम्ही वाचविलेले आहे. बघुया एकदा सर्वांना फिरुद्या.... असे ठाकरे म्हणाले.

तुमचा दलाल महाराष्ट्रात बसला होता. राज्यपाल मला पत्र लिहून तुम्हाला साक्षात्कार होतो का असे विचारत होते. मंदिरे उघडा म्हणून सांगत होते. मी मंदिरे उघडली नाहीत. सर्व धर्मियांची उघडली नाहीत, या सर्वांनी माझे ऐकले. प्रवासी मजूरसुद्धा तिकडे जाऊन सांगत होते, आमच्या राज्यात काहीच नाही महाराष्ट्राचे सरकार आमची काळजी घेत होते. बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा चालवताय, शिंदे गटाची शेपूट एवढी आत गेलीय. भाजपाच्या कार्यालयांवर, नेत्यांच्या बॅनरवर असे हातोडे मारण्याची हिंमत ठेवाल का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना विचारला.  

देवेंद्र फडणवीस कुटुंब तुमचेही आहे; उद्धव ठाकरेंचा उघड इशारा, मुफ्तींवरूनही प्रत्यूत्तर

शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आम्ही भीक मागू, पण उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला सोडणार नाही, असे मला नगरसेवकाने सांगितले. अनेकांना फोन येतायत. पोलिस करतायत. मला त्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव समजलेय त्याला काय निरोप द्यायचा तो दिलाय, असे ठाकरे म्हणाले. त्यांच्याकडे खोके आहेत, आमच्याकडे जनता आहे. उपरा, दलाल येतोय आणि आमच्या मराठी माणसांवर दादागिरी करतोय. माझ्यासाठी मुंबा आई आहे तर तुमच्यासाठी सोन्याचे अंडी देणारी कोंबडी असेल, असा टोला ठाकरे यांनी लगावला. 

तुम्ही ज्या ज्या यंत्रणा आज वापरताय त्या सर्वांच्या आई-बापांना, नातेवाईकांना आम्ही वाचविलेले आहे. बघुया एकदा सर्वांना फिरुद्या. नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुका घेतील. ज्या पद्धतीने त्यांचे बदनाम करायचे काम सुरु आहे ते पाहता तेव्हा होतील. माझ्या घरात एकही पैसा आलेला नाही. जर चौकशी करणार असाल तर ठाणे महापालिकेची करा, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, उत्तर प्रदेश इथली देखील करा. त्यांचे शंभर अपराध भरत आलेत. जेव्हा वेळ येईल तेव्हा जशासतसे कडक उत्तर द्यायची तयारी ठेवा, असे ठाकरे म्हणाले. 

कालच्या विरोधी पक्षांच्या बैठकीत मी एकटाच असा होतो ज्याच्याकडे पक्ष नव्हता, पद नव्हते, मुख्यमंत्र, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, अध्यक्षपद असे काहीच नव्हते. आपण पुरून उरणार हे त्यांना माहितीये, पण यांना माहिती नाहीय, असे ठाकरे म्हणाले. मिळेल तिथे खा ही आमची परंपरा नाही. कोरोनाकाळात मोदींनी नुसत्या थाळ्या वाजवायला सांगितल्या होत्या. ऑक्सिजन देताना काय काय घडले ते सर्वांना माहिती आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी आहे. अनेकांच्या गोष्टी अनेकांकडे आहेत. देवेंद्र फडणवीसांनी एक लक्षात ठेवावे कुटुंब तुमच्याकडेही आहे. उद्धव ठाकरे खलनायक आहे की नाही जनता ठरवेल. पण तुम्ही नालायक आहात हे जनतेला माहिती आहे. सूरज चव्हाण साधा शिवसैनिक आहे, असे ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना