मे हिटचा तडाखा

By Admin | Updated: May 22, 2014 21:45 IST2014-05-22T08:45:18+5:302014-05-22T21:45:05+5:30

गेल्या दोन-चार दिवसांपासून उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे.

I hit the hit | मे हिटचा तडाखा

मे हिटचा तडाखा

अकोला : गेल्या दोन-चार दिवसांपासून उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. तापमानाचा पाराही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे दुपारी शहरातील गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीपासून शहरातील तापमानाचा पारा ४0 अंश सेल्सिअसच्या वरच स्थिरावला आहे. दररोज तापमानात वाढ होत असल्यामुळे उकाडाही वाढला आहे. परिणामी अकोलेकर जनता चांगलीच त्रस्त झालेली दिसत आहे. मंगळवारी दिवसभरात शहरात कमाल ४३.६ तर किमान २९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हा उकाडा रात्री उशिरापयंर्त जाणवत होता. रात्री ९ वाजेपयंर्त गरम वारे वाहत असल्याने गरम वाफाच्या झळा बसत होत्या. नैऋत्य मोसमी पाऊस अंदमानपयंर्त आला असून, अकोल्यात कधी पाऊस पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: I hit the hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.