शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ED at Sanjay Raut Residence: 'मी सावध केलेले पण ऐकतील ते संजय राऊत कुठले'; रामदास कदमांनी घेतले अनिल परबांचेही नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 10:45 IST

ED at Sanjay Raut Residence: पत्रा चाळ प्रकरणी राऊत यांना गेल्या काही काळापासून ईडी समन्स बजावत होती. यावर राऊत वेगवेगळी कारणे देत चौकशी टाळत होते.

वसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी सकाळी सकाळीच ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत.  संजय राऊत आणि त्यांची पत्नी यांची चौकशी सुरु आहे. शिवसैनिक जमू लागल्याने पोलिसांचा आणखी फौजफाटा मागविण्यात आला आहे. राऊत यांना ईडी आज ताब्यात घेण्याची शक्यता आहे. त्यांना ईडीच्या कार्यालयात नेले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. 

Sanjay Raut ED Action: संजय राऊतांना कोणत्याही क्षणी ईडी ताब्यात घेणार; पोलिसांचा मोठा फौजफाटा, शिवसैनिक जमण्यास सुरुवातयातच शिवसेनेचे शिंदे गटात गेलेले नेते, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यास यशस्वी ठरले. उद्धव ठाकरेंना मी दोष देणार नाही, परंतू त्यांचे मन राऊतांनी वळविले. रोज सकाळी ते रात्री झोपेपर्यंत राऊत टीका करत सुटायचे. महाविकास आघाडीचे एजंट सारखे वागत होते. राऊत माझे चांगले मित्र आहेत, त्यांना मी सांगितलेले हे थांबवा, परंतू ऐकतील ते संजय राऊत कुठले, असे रामदास कदम यांनी म्हटले.माझा मुलगा योगेश कदम याला राजकीयदृष्ट्या संपविण्यासाठी अनिल परब यांनी काम केले. आमची नगरपालिका राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचे काम त्यांनी केले.  शिवसेना कोणी संपविली? याच लोकांनी असा आरोप कदम यांनी केला. राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला अजित पवार १० कोटी रुपये देतात. उद्धव ठाकरेंना बरे नव्हते, त्यामुळे ते मंत्रालयात जात नव्हते. यामुळे पवारांना आंदनच मिळाले असा आरोप कदम यांनी केला. 

संजय राऊत हे खचणारे नाहीत. ते ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील. ते कोणत्याही प्रश्नाची उत्तरे द्यायचे, आपण पाहिले. यामुळे ते ईडीच्या चौकशीला सामोरे जातील असेही कदम म्हणाले. 

पत्रा चाळ प्रकरणी राऊत यांना गेल्या काही काळापासून ईडी समन्स बजावत होती. यावर राऊत वेगवेगळी कारणे देत चौकशी टाळत होते. यापूर्वी २० जुलैला नंतर २७ जुलैला ईडीने समन्य बजावले होते. परंतू राऊत यांनी लोकसभा अधिवेशन सुरु असल्याने उपस्थित राहू शकत नाही, असे ईडीला कळविले होते. शनिवारी राऊत मुंबईत आले आणि ईडीने रविवारी सकाळीच राऊतांच्या घरी हजेरी लावली.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRamdas Kadamरामदास कदमShiv SenaशिवसेनाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय