मी नागीण, नादी लागू नका ! - सुळे

By Admin | Updated: October 8, 2016 04:14 IST2016-10-08T04:14:48+5:302016-10-08T04:14:48+5:30

भाजपाचे नेते सुडाचे राजकारण करीत असून, मुख्यमंत्री आपल्याकडे विरोधकांची कुंडली असल्याच्या धमक्या देतात.

I do not apply herpes, nadi! - Sule | मी नागीण, नादी लागू नका ! - सुळे

मी नागीण, नादी लागू नका ! - सुळे


जळगाव : भाजपाचे नेते सुडाचे राजकारण करीत असून, मुख्यमंत्री आपल्याकडे विरोधकांची कुंडली असल्याच्या धमक्या देतात. पण मी दस नंबरी नागीण असून, मराठमोळी महिला आहे. त्यांच्या धमक्यांना अजिबात घाबरणार नाही, उगीचच त्यांनी आमच्या नादी लागू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी येथे दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगावमध्ये केळी, कापूस उत्पादकांची परिषद झाली. कापसाला १० हजार रुपये तर केळीला क्विंटलमागे १,५०० रुपये भाव मिळावा व इतर मागण्यांसाठी खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)
>‘बाळासाहेबांसारखे राजकारण करावे’
भाजपाची मंडळी सुडाचे राजकारण करीत आहेत. पूर्वी बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांनी एकमेकांवर टोकाची टीका केली, पण सुडाचे राजकारण कधी केले नाही. मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी येथे उशिराने भेट दिली. कोपर्डी घटनेचे मी राजकारण केले नाही, असे त्या म्हणाल्या.

Web Title: I do not apply herpes, nadi! - Sule