मी शिवसेना, भाजप, मनसेवर आरोप केला नाही - कपिल शर्मा
By Admin | Updated: September 9, 2016 20:03 IST2016-09-09T20:01:54+5:302016-09-09T20:03:57+5:30
मुंबई महापालिकेच्या अधिका-यांवर लाच मागितल्याचा आरोप करणारा अभिनेता कपिल शर्माला हे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागताच तो बॅकफूटवर आला आहे.

मी शिवसेना, भाजप, मनसेवर आरोप केला नाही - कपिल शर्मा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - मुंबई महापालिकेच्या अधिका-यांवर लाच मागितल्याचा आरोप करणारा अभिनेता कपिल शर्माला हे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागताच तो बॅकफूटवर आला आहे. कपिल शर्माने शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा टि्वट केले.
मी भ्रष्टाचाराबद्दल फक्त माझी चिंता व्यक्त केली. मी अशा काही भ्रष्ट लोकांचा सामना केला आहे. मी भाजप, शिवसेना आणि मनसे अशा कुठल्याही पक्षावर आरोप केलेला नाही असे टि्वट कपिलने केले आहे. कपिल शर्माने शुक्रवारी सकाळी टि्वटच्या माध्यमातून महापालिकेवर पाच लाखांची लाच मागितल्याचा आरोप केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कपिलच्या टि्वटची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले. शिवसेना आणि मनसेने देखील कपिल शर्माकडे त्या भ्रष्ट अधिका-याचे नाव सांगण्याची आणि आरोपांचे पुरावे देण्याची मागणी केली.
पण नंतर ज्या बांधकामासाठी लाच मागितल्याचा आरोप कपिल शर्माने केला त्या ऑफिसचं बांधकामच अवैध असल्याचा दावा स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजेश मुदगल यांनी केला. त्यामुळे कपिलच उलटा अडचणीत सापडला होता.
I just voiced my concern on the corruption I faced with certain individuals..Its No blame on any political party be it BJP, MNS or ShivSena
— KAPIL (@KapilSharmaK9) September 9, 2016