शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Pankaja Munde : "मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री"; पंकजा मुंडेंनी सांगितलं त्यावेळी नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 20:38 IST

BJP Pankaja Munde : "मुंडे साहेबांच्या कोणत्याही गोष्टीचा फायदा उचलणं हे माझं मुख्य ध्येय नव्हतं. त्यांचा संकल्प पूर्ण करणं हे ध्येय होते."

शिवशक्ती परिक्रमेमधून मनापासून ईश्वराचे आभार मानावेसे वाटले, कारण लोकांचं एवढं प्रेम आहे. परिक्रमेमध्ये कोणतंही मिशन नव्हतं. देवदर्शनासाठी मी निघाले, भव्यदिव्य अनुभव होता. मुंडे साहेबांना नक्की अभिमान वाटला असेल की माझ्या मुलीने शक्ती वाढवली, असं भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. लोकमत व्हिडिओचे एडिटर आशिष जाधव यांनी त्यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्री पदासह विविध विषयांवर पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे.

"मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री" हे पंकजा मुंडेंचं विधान खूप व्हायरल झालं होतं. त्याची सर्वत्र चर्चा रंगली. मात्र यावर आता पंकजा यांनी त्यावेळी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. "मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे असं विधान केलं होतं यावर बऱ्याचदा उत्तर दिलं आहे. हा एका कार्यक्रमातला विषय आहे. तो कार्यक्रम काँग्रेसचा होता. मंचावर काँग्रेसचे अनेक पुढारी होते आणि त्यांनी भाषण केलं की पंकजा ताई तुम्ही मुख्यमंत्री व्हाल असं वाटलं होतं कारण तुम्ही संघर्षयात्रा केली."

"ताई तुम्ही मुख्यमंत्री नाही झालात पण जनतेच्या मनात मात्र तुम्हीच मुख्यमंत्री आहात तर त्याला उत्तर देताना मी ते म्हटलं होतं. हसत-खेळत तो कार्यक्रम झाला होता. पण वेळोवेळी मी यावर उत्तर दिलं आहे. मला स्वत: हे माहीत होतं की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत" असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. "गोपीनाथ मुंडेंचंभाजपासोबतचं नातं चांगलं होतं, त्यांचं मोठं वलय होतं त्याचा फायदा का घेतला नाही?" यावर देखील पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितलं. 

"मुंडे साहेबांच्या कोणत्याही गोष्टीचा फायदा उचलणं हे माझं मुख्य ध्येय नव्हतं. त्यांचा संकल्प पूर्ण करणं हे ध्येय होते. कधीही जातीवादाला खतपाणी घातलं नाही. लोकांचा आवाज उठवण्यासाठी डगमगायचं नाही. मुंडे साहेबांच्या वलयाचा फायदा घेणं हा माझा अजेंडाच नव्हता. वलय टिकावं आणि वाढावं हे माझं कर्तव्य आहे" असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाGopinath Mundeगोपीनाथ मुंडेPoliticsराजकारण